Pune : सुतारवाडी जवळ बसचा अपघात

सहा चारचाकी व तीन दुचाकीचे नुकसान झाले आहे.
pune
pune sakal
Summary

सहा चारचाकी व तीन दुचाकीचे नुकसान

Summary

औंध : मुंबई बेंगलोर महामार्गावर सुतारवाडी जवळ एसटीचे ब्रेक निकामी झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी व दोन किरकोळ जखमी झाल्याची घटना दोन वाजता घडली आहे.यामध्ये सहा चारचाकी व तीन दुचाकीचे नुकसान झाले आहे.

सर्व जखमींना बावधन येथील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.बोरीवलीहून साता-याकडे जाणारी एस टी बस क्रमांक एम एच ०४.जेके ३१४९ हि बस साता-याकडे जात असताना सुतारवाडी येथील उड्डाणपूलावरुन उतारावर आली असता ब्रेक निकामी झाले इतर वाहनांना धडक बसली.

चालक व्हि.एस.जाधव या चालकास हिंजवडी पोलीस ठाण्याअंतर्गत बावधन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com