मानकर चौकात प्रवासी बसला आग

मानकर चौकात
प्रवासी बसला आग
Published on

वाकड, ता. २१ : भुमकर चौकात स्कूल व्हॅनने पेट घेतल्याची घटना ताजी असतानाच मानकर चौकात प्रवाशांनी भरलेल्या ५० आसनी ट्रॅव्हल्स बसच्या खालील बाजूस अचानक आग लागली. शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवल्याने आणि आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने पाणी ओतून आगीची तीव्रता कमी केल्याने जीवितहानी टळली. रहाटणी आणि थेरगाव अग्निशमन उपकेंद्राचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझविली. डिझेल टाकीतून गळती झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकारामुळे मानकर चौक ते वाकड दरम्यान प्रचंड कोंडी झाली. वाकड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने जळालेली बस रस्त्याच्या बाजूला हटविण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com