पुणे महानगरपालिकेतील बस 'न'पोहचलेला गाव

ज्येष्ठ नागरिकांसह महिला व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ
PMT Bus
PMT BusSakal

आंबेगाव - पुणे महानगरपालिका हद्दीतील असणाऱ्या गावात अजूनही राज्य परिवहन महामंडळ किंवा पीएमपीएलची बससेवा पोहचलेली नाही, असे सांगितले तर कोणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु, ही सत्य घटना आहे. पुणे जुन्या मनपा हद्दीपासून फक्त ४ किमी अंतर असलेल्या आणि नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांपैकी एक असलेला कोळेवाडी गाव अस्तित्वात आल्यापासून गावात एकदाही बस पोहचली नाही ही मोठी शोकांतिका आहे.

साधारण एक हजार लोकसंख्या असलेले कोळेवाडी गाव हे जांभूळवाडी कोळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये होते आणि पुणे महानगरपालिकेतील शेवटचे गाव आहे. जांभूळवाडी पर्यंत पीएमपीएल कात्रज आगाराच्या बस फेऱ्या मारत आहेत. शिवाय, दोन-तीन गाड्या जांभूळवाडीत उभ्या असतात. परंतु, जांभुळवाडी पासून तीन किलोमीटर अंतरावरील कोळेवाडीत मात्र बस जात नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह महिला व विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ होताना दिसते आहे. त्यामुळे,शाळकरी व कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते आहे. दोन वर्षापूर्वी बससेवा सुरू व्हावी म्हणून गावकऱ्यांनी कात्रज आगाराला विनंती अर्ज केला होता. त्यानंतर, कात्रज आगारातील अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणीही केली होती.

दरम्यान,मुद्रा रिसॉर्ट जवळ असणाऱ्या वळणावर बस वळू शकणार नाही. ही सबब देऊन पुढे कोणतीही कार्यवाही पीएमपीएल कडून करण्यात आली नाही. जांभूळवाडीत पीएमपीएलच्या बस उभ्या असतात पण कोळीवाडीत मात्र बस येत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत.एकीकडे मेट्रोसिटी म्हणून मिरवणारी पुणे महानगरपालिका समाविष्ट गावांकडे दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल येथील रहिवाशी उपस्थित करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास कसा करावा?

गावातील तरुणांकडे मोटरसायकली आहेत, परंतु, वृद्ध आणि जेष्ठ नागरिकांनी कसा प्रवास करावा असा प्रश्न जेष्ठ नागरिक उपस्थित करत आहेत.

'आम्ही दोन वर्षांपूर्वी कात्रज आगारात बस सुरु व्हावी म्हणून अर्ज केला होता.त्यावर योग्य कार्यवाही झाली नाही. बस सेवा सुरु झाली तर गावातील शैक्षणिकपटात वाढ होईल. विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठांना याचा फायदा होईल.पावसाळ्यात गावकऱ्यांची दळणवळणाची सोय होईल.

- आदिवासीपाडा कोळेवाडी युवक समिती कोळेवाडी.

'जांभूळवाडी कोळेवाडी दरम्यान असणाऱ्या रस्त्याचा पीएमपीएल कडून सर्व्हे करण्यात येईल.त्यानंतर बसची व्यवस्था करण्यात येईल.

- दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक पीएमपीएल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com