कालठण येथे बस सेवा पूर्ववत झाल्याने; ग्रामस्थांनी चालक, वाहकाचा फेटा घालून सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus service started at Kalthan number one villagers felicitated driver and conductor with feta indapur

कालठण येथे बस सेवा पूर्ववत झाल्याने; ग्रामस्थांनी चालक, वाहकाचा फेटा घालून सत्कार

इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात महत्त्वाचे पुनर्वसित तसेच कर्मयोगी शंकररावजी पाटीलसहकारीसाखर कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाचे आगार असणाऱ्या तालुक्यातील कालठण नंबर एक येथे प्रदीर्घकाळा नंतर म्हणजेच तब्बल दोन वर्षानंतर एस टी बस सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. कोरोना महामारी व त्यानंतर एस टी कामगारांच्या संपामुळे नागरिकांचे हाल होत होते मात्र बससेवा पुर्ववत झाल्याने ज्येष्ठनागरिक ,महिला व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळी सव्वासात व दुपारी दोन वाजता अशी दिवसातून दोनवेळा बससेवा सुरू झाली आहे. बससेवेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने बसचालक प्रवीण माने यांचा जेष्ठ नागरिक साहेबराव पांडुळे तर वाहक पंचशील गवळी यांचा सत्कार दादासाहेब जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रामराव पाटील व विष्णू जावळे यांनी बस ला हार घालून श्रीफळ फोडून बस सेवेचे स्वागत केले. बससेवा सुरू होण्यासाठी कालठण ग्राम पंचायत तसेच गोविंद पाडुळे,अण्णासाहेबजगताप ,श्यामराव लावंड, नितीन क्षीरसागर, ब्रह्मदेव सपकळ, नितीन ढेरे, दादा मुलाणी यांनी प्रयत्न केले. बससेवा पूर्ववत केल्याबद्दल कालठण ग्रामस्थांच्या वतीने कर्मयोगी कारखान्याचे संचालक हनुमंत जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य भारत शिंदे, कालठण सोसायटीचे संस्थापक किसनराव जावळे यांनी आगार व्यवस्थापक महेबुब मणेर, स्थानक प्रमुख श्री. वाघमोडे, श्री. खाडे,कार्य शाळा अभियंता श्री. शेलार, नितीन ढेरे, मिटू खाडे, श्री. तोरसकर यांचे आभार मानले.

Web Title: Bus Service Started At Kalthan Number One Villagers Felicitated Driver And Conductor With Feta Indapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top