बसचे स्टेअरिंग तुटल्याने हॉटेलमध्ये बस घुसली

बसचे स्टेअरिंग तुटल्याने हॉटेलमध्ये बस घुसली
Published on: 

KEG26A02357

बसची स्टेअरिंग तुटले, हॉटेलमध्ये बस घुसली

नगर तालुका, ता. २० ः विठ्ठलवाडी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथून अहिल्यानगरकडे येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस टाकळी खातगाव गावातून जात होती. यावेळी बसची स्टेअरिंग अचानक तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. ही घटना शुक्रवारी (ता.१६) रात्री सुमारे दहाच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाबाजी प्रभाकर गंधाक्ते (वय ४३, रा. वडजिरे, ता. पारनेर) हे गेल्या ११ वर्षांपासून एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत. ते सीएनजी बस घेऊन विठ्ठलवाडी येथून तारकपूरकडे २४ प्रवाशांसह निघाले होते. टाकळी खातगाव परिसरात बस आल्यानंतर अचानक पुढील स्टेअरिंग साईडचे पार्ट तुटल्याने बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या निळकंठ हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात हॉटेलचा अर्धा भाग उद्ध्वस्त झाला असून छताचे पत्रे, फर्निचर, टेबल-खुर्च्या, फ्रिज, गेट आदी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच बसच्या समोरील काचा फुटून बसचेही नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

National Transport Master Plan' to be Prepared; Technical Appraisal of Projects Costing Over 500 Crores
Solapur E-Bus Service
Solapur Auto Fare Hike
Timber Transport Bribe
Marathi News Esakal
www.esakal.com