शाळा सुरू आणि सुटण्याच्या वेळी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात

कोरोनाचा ज्वर कमी झाला असल्याने शाळा पूर्णवेळ सुरू झाल्या असल्या तरी, स्कूल बस आणि स्कूल रिक्षा सुरू नसल्यामुळे पालकांची घुसमट होत आहे.
PMP Bus
PMP BusSakal
Updated on
Summary

कोरोनाचा ज्वर कमी झाला असल्याने शाळा पूर्णवेळ सुरू झाल्या असल्या तरी, स्कूल बस आणि स्कूल रिक्षा सुरू नसल्यामुळे पालकांची घुसमट होत आहे.

उंड्री - कोरोनाचा (Corona) ज्वर कमी झाला असल्याने शाळा (School) पूर्णवेळ सुरू झाल्या असल्या तरी, स्कूल बस (School Bus) आणि स्कूल रिक्षा (Rickshaw) सुरू नसल्यामुळे पालकांची (Parents) घुसमट होत आहे. पीएमपी (PMP) प्रशासनाने (Administrative) शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी त्या त्या परिसरात बसेसच्या (Bus Round) जादा फेऱ्या सुरू करून विद्यार्थ्यांची (Students) गैरसोय दूर करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

खंडेराव जगताप, प्रणय भोसले, वैष्णवी सातव म्हणाल्या की, उंड्री, हांडेवाडी, होळकरवाडी, पिसोळी, महंदवाडी परिसरामधील शैक्षणिक संकुलात आणि शहर-उपनगरामध्ये शिक्षणासाठी ये-जा विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळविताना कसरत करावी लागत आहे. तसेच या परिसरामध्ये जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी शैक्षणिक संकुले आहेत. स्कूल बसेस आणि रिक्षा सुरू कराव्यात, तसेच पीएमपी प्रशासनाने शाळा-महाविद्यालयांच्या वेळापत्रकानुसार बसेसची संख्या वाढवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, असा सूर पालकवर्गातून उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.

PMP Bus
रेडिओ स्फोटांच्या उत्पत्तीचा नवा अध्याय; पहिल्या वेगवान एफआरबीचा शोध

मागिल दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यामुळे पालक-मुलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आर्थिक समस्येमुळे ऑनलाइन शिक्षणापासून अनेक कष्टकऱ्यांच्या दूर राहावे लागले, त्यांच्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे होते, अशी भावना मजूर अड्ड्यावरील ज्ञानेश्वर कांबळे यांनी व्यक्त केली.

लॉकडाऊनमध्ये रोजगार मिळत नव्हता, त्यामुळे पोटपूजा करायची की मुलांना महागडे मोबाईल घ्यायचे असा प्रश्न आमच्यासमोर उभा होता. गावाकडे जायचे तर तिकडेही तीच परिस्थिती होती. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी आमची परिस्थिती निर्माण झाली होती. आता शाळा सुरू झाल्यामुळे आमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल, अशी भावना पालकांनी व्यक्त केल्याचे होळकरवाडीतील शिक्षक रोहिदास एकाड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com