पुणे - ‘शेअर ट्रेडिंग, आयपीएल सट्टा आणि रेसकोर्समधून कोट्यवधींचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे..या प्रकरणी सईद अहमद शेख (वय ३६, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी गोसावी या ‘फायनान्स कन्सल्टंट’च्या नावाने नरपतगिरी चौकात कार्यालय होते. व्यावसायिक शेख यांचा भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे..आरोपींनी शेख यांना भरपूर फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत २१ लाख रुपये घेतले. सुरुवातीला सहा लाख रुपयांचा ऑनलाइन परतावा देत विश्वास संपादन केला; परंतु उर्वरित १५ लाखांसाठी दिलेला धनादेश वटला नाही. व्यावसायिकाने रक्कम मागितली असता, गोसावीच्या साथीदारांनी धमक्या दिल्या. अखेर व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली..त्यानुसार किरण गोसावी, त्यांची मुलगी पल्लवी गोसावी, अर्शद शेख (रा. केडगाव) आणि प्रसाद विश्वनाथ कांबळे (रा. सोमवार पेठ) या चौघांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..दरम्यान, या प्रकरणी आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.