कोंढवा - कोंढव्यातील साईनगर भागातील व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे हे शनिवारी (ता. १९) पुण्यातून विमानाने जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मित्र संतोष जगदाळे हे देखील होते..काश्मीर खोऱ्यातील पहेलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने नातेवाईकांत आणि मित्र परिवारात मनमिळावू व्यक्ती गेल्याची भावना निर्माण झाली आहे.कौस्तुभ यांचा मागील तीस वर्षांपासून गणबोटे फरसाण हाऊस या नावाने व्यवसाय आहे. अगदी छोट्याशा व्यवसायातून त्यांनी गणबोटे फरसाण हाऊस हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. कौस्तुभ यांना एक मुलगा असून त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला होता. अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती..त्यांच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह आज विमानाने रात्री बाराच्या सुमारास पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.गोळीबार सुरु होता तेव्हा संतोष आणि कौस्तुभ व इतर पर्यटक हॉटेलबाहेर बसले होते. गोळीबाराचा आवाज झाल्याने आरडाओरड सुरु झाली. पर्यटक धावपळ करू लागले, त्यामुळे दहशतवाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात संतोष यांच्या खांद्याजवळ तर कौस्तुभ यांच्या कमरेच्या खाली गोळी लागुन गेली..गोळीबारानंतर सुरुवातीला धावपळ सुरू होती. कौस्तुभ यांचा त्यांच्या पत्नीने शोध घेतल्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांचा मुलगा कुणाल हा कौस्तुभ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच पुण्यातून त्यांच्याकडे विमानाने रवाना झाला आहे.कौस्तुभ यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. शुगरचा त्रास असल्याने रक्त थांबत नव्हते. तर, जवळच असणारे संतोष यांनाही मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने कौस्तुभ घाबरून गेले. गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.