पुण्यात व्यवसायिकाचे रिक्षातून अपहरण; अडीच लाखांना लुटले

टीम ई-सकाळ
रविवार, 19 जानेवारी 2020

अँथोनी यांची तनुश्री सिक्यु रिटी अँड फॅसलिटी नावाची खासगी संस्थांना सुरक्षारक्षक व अन्य सेवा पुरविणारी कंपनी आहे. त्यांचे बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर त्यांचे कार्यालय आहे.

पुणे : डेक्कन जिमखाना येथील शिरोळे रस्त्यावरून पायी जात असलेल्या एका व्यावसायिकाचे रिक्षातून अपहरण करून चोरट्यांनी त्याच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड व मौल्यवान वस्तू असा ऐवज लुटून नेला. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. व्यावसायिकाकडून पैसे लुटल्यानंतर चोरट्यांनी त्यांना कात्रज परिसरात सोडून देत चोरटे पसार झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी अँथोनी सॅबस्टिन चवरु (वय 46, रा. सोमाटणे, ता. वडगाव मावळ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अँथोनी यांची तनुश्री सिक्यु रिटी अँड फॅसलिटी नावाची खासगी संस्थांना सुरक्षारक्षक व अन्य सेवा पुरविणारी कंपनी आहे. त्यांचे बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर त्यांचे कार्यालय आहे. शनिवारी सायंकाळी ते वैयक्तीक कामानिमित्त शहरात आले होते. डेक्कन येथील आपटे रस्त्याजवळ असलेल्या शिरोळे रस्त्यावरून सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास फर्ग्युसन महाविद्याल रस्त्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांनी शिरोळे रस्त्यावरील एका चहाच्या टपरीवर चहा घेतला. त्यानंतर ते पायी जात असताना रिक्षातून आलेल्या तिघांनी त्यांना धमकी देत जबरदस्तीने रिक्षात बसविले. रिक्षा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी फिरवित असताना त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्यांच्याकडील पिशवीमध्ये असणारी अडीच लाख रुपयांची रक्कम, चष्मा, हातातील घड्याळ व मोबाईल, असा ऐवज काढून घेतला. त्यानंतर त्यांना कात्रज येथील चौकामध्ये सोडून देत चोरट्यांनी पलायन केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झांजुर्णे तपास करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आणखी एकाची लूट
कात्रज-कोंढवा रस्त्यावर शुक्रवारी रात्री रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या बसंतलाल प्रजापती (वय 22, रा. दगडे वस्ती, पिसोळी) या तरुणाला चोरट्यांनी लुटले होते. प्रजापती हे रिक्षाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना धमकावले. त्यानतंतर त्यांच्याकडील पाच लाखांची रोकड, सोनसाखळी व मोबाईल असा ऐवज चोरून नेला. तत्पूर्वी एका सराफी व्यावसायिकाला शिवाजीनगर पोलीस वसाहतीसमोर, व अन्य एका व्यक्तीला सिंहगड रस्ता परिसरात लुटण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: businessman kidnapped in pune looted for two and half lakh rupees