

Tamhini Ghat Accident Raigad Businessman Death
esakal
Tamhini Ghat Fortuner Accident : ताम्हिणी घाटात तब्बल १२०० फूट खोल दरीत फॉर्च्युनर कार कोसळून झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेले उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (SVRSS) च्या बचाव पथकाला यश आले. अत्यंत दुर्गम आणि आव्हानात्मक परिस्थितीत आधुनिक बचाव साहित्याच्या साहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली.