Vidhan Sabha 2019 : सुनील कांबळे यांना व्यापारी, व्यावसायिकांचाही पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

विजयाचा पेढा

- चॉकलेटमुळे चिमुकलीला आनंद

- हास्यविनोदाचेही क्षण

कॅन्टोन्मेंट (पुणे) : गेल्या दोन दिवसांपासून सामान्य नागरिकांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यासारखाच प्रतिसाद व्यापारी पेठांमधूनही महायुतीच्या उमेदवाराला मिळत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. भाजप-शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांची सकाळी रास्ता पेठ, नाना पेठ परिसरात पदयात्रा झाली. या पदयात्रेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मोठे व्यावसायिक, छोटे दुकानदार, हातगाडीवाले, फळविक्रेते, किराणा मालाचे दुकानदार अशा सर्वांनी कांबळे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कांबळे यांनी प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही मित्रांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. या भागातील छोटे-मोठे व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक यांच्या काही समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी येत्या काळात कसोशीने प्रयत्न करू, असे आश्वासनही यावेळी कांबळे यांनी दिले.

Vidhan Sabha 2019 : थोरात म्हणतात, ‘भाजप मजेशीर पक्ष; नेते सोडून पीएला उमेदवारी’

विजयाचा पेढा

मिठाईच्या एका दुकानात कांबळे कार्यकर्त्यांसह गेले असता दुकानदाराने त्यांचे स्वागत केले. सुनील कांबळे यांनी त्यांची विचारपूस केली, समस्यांबाबत जाणून घेतले. त्यानंतर दुकानदाराने विजयासाठी शुभेच्छा तर दिल्याच पण त्यासोबतच त्यांना विजयाचा पेढाही भरवला.

चॉकलेटमुळे चिमुकलीला आनंद

पदयात्रा सुरू असताना एका आईच्या कडेवर चिमुकली मुलगी बसली होती. पदयात्रेतील कार्यकर्त्यांच्या गर्दीकडे ती उत्साहाने पाहात होती. पदयात्रा जवळ आल्यावर ऊन असल्याने एका कार्यकर्त्याने तिच्या डोक्यावर टोपी घातली. त्यानंतर सुनील कांबळे यांनी तिला चॉकलेट दिले. तेव्हा ते चॉकलेट बघून चिमुकली हरखून गेली.

डोंबाऱ्याच्या मुलीच्या गालावर हसू

रस्त्याने चालताना एक छोटी मुलगी डोंबाऱ्याचा खेळ करत असताना दिसली. तेव्हा पदयात्रेतील कार्यकर्त्यांनी तिची विचारपूस केली. सुनील कांबळे यांनीही तिला जवळ घेऊन तिची विचारपासू केली. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

नगरसेविका मनिषा लडकत, योगेश समेळ, कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे जयप्रकाश पुरोहित, अॅड. यश वालिया, संदीप जांभळे, गणेश यादव, रफिक शेख, तुषार पाटील, संदीप लडकत यांच्यासह भाजप-शिवसेना, आरपीरआय (ए) आदी यावेळी उपस्थित होते.

हास्यविनोदाचेही क्षण

पदयात्रेत उन्हात सतत फिरावे लागते. या रणरणत्या उन्हात काही क्षण आनंदाचा शिडकावा करून जातात. सुनील कांबळे एका दुकानदाराशी संवाद साधत असताना तेथील ज्येष्ठाने विनोदाने कोटी केली तेव्हा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर खळखळते हास्य उमटले. या हास्याने उपस्थितांना उन्हातही गारव्याचा अनुभव दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Businessmen and Others Supports to Sunil Kamble Maharashtra Vidhan Sabha 2019