esakal | मटण, मासळी, चिकन विक्रेत्यांचा यंदा बेरंग
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken

यंदा चिकनची मागणी निम्म्याने घटली आहे. ‘कोरोना’बाबत समाज माध्यमातून प्रसारित केल्या जाणाऱ्या संदेशामुळे चिकनच्या भावात ५० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. गेल्या आठवड्यात प्रतिकिलो चिकनचा दर १४० रुपये असा होता. चिकनच्या मागणीत घट झाल्याने सध्या बाजारात चिकनची विक्री ९० ते १०० रुपये या दराने केली जात आहे.
- रूपेश परदेशी, चिकन विक्रेते

मटण, मासळी, चिकन विक्रेत्यांचा यंदा बेरंग

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळवड असूनही मागणी कमी; कोरोनाचा फटका
मार्केट यार्ड - ‘कोरोना’मुळे यंदा खवय्यांकडून धुळवडीला मटण आणि मासळीला मागणी तुलनेने बेताची होती. चिकनचे भाव कमी होऊनही मागणी निम्म्यापेक्षा जास्त घटली आहे. त्यामुळे यंदाची धुळवड चिकन, मटण आणि मासळी विक्रेत्यांसाठी फारशी चांगली गेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रत्येक वर्षी धुळवडीला मटण, मासळी, चिकनला खवय्यांकडून मोठी मागणी असते. यंदाच्या वर्षी धुळवडीला मटण, मासळी, चिकनला मागणी तुलनेने कमी आहे. यंदा आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे अनेकजण बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. दर वर्षी धुळवडीच्या दिवशी मटणाच्या मागणीत तिपटीने वाढ होते; परंतु यंदा मागणी खूपच कमी असल्याचे पुणे शहर मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान, चिकनच्या तुलनेत मटणाला मागणी जास्त आहे. त्यामुळे भवानी पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठेतील मटण मार्केट, गुरुवार पेठ, फर्ग्युसन रस्त्यावरील चापेकर मार्केट, लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती. दरवषीला धुळवडीला असणारी मागणी पाहता यंदा मटण, मासळी आणि चिकनला बेताची मागणी राहिली.

होळीमुळे मासेमारी थांबली आहे. त्यामुळे बाजारात मासळीची आवक कमी झाली आहे. मंगळवारी गणेश पेठेतील मासळी बाजारात चार ते पाच टन मासळी दाखल झाली होती. तुलनेने मासळीला मागणी चांगली होती. मागणीच्या तुलनेत मासळीची आवक कमी झाल्याने दरात दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली.
- ठाकूर परदेशी, मासळी बाजारातील व्यापारी