esakal | पुणे : गांधी-शास्त्रींचे विचार जनतेपर्यंत पोहचवून
sakal

बोलून बातमी शोधा

गांधी-शास्त्रींचे विचार जनतेपर्यंत पोहचवू

गांधी-शास्त्रींचे विचार जनतेपर्यंत पोहचवू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

विश्रांतवाडी : महात्मा गांधी यांच्या १५२व्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील इंडियन मुस्लिम फ्रंट या एन. जी.ओ.तर्फे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांनी दिलेल्या संदेश व उपदेशांचे फलक हातामध्ये धरून शंभर कार्यकर्ते कॅम्प येथील महात्मा गांधी रोडवर उभे होते. या प्रसंगी माननीय मिलिंद गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस आयुक्तालय, पुणे, इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वृंद व इंडियन मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष मुनव्वर कुरेशी, अध्यक्ष हाजी गौस्मुद्दिन शेख उपाध्यक्ष साहिल सय्यद इमरान शेख आणि महासचिव हाजी मुजफ्फर इनामदार, अल्ताफ शेख, सादिक शेख, हाफिज फरीद शेख, शब्बीर शेख, नदीम तांबोळी, समीर तांबोळी, तसेच इतर सभासद उपस्थित होते. तसेच जयंतीनिमित्त रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्व नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले.

loading image
go to top