
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा गैरफायदा घेत कॅबचालकांकडून वाढीव शुल्क आकारणी करण्यात आली. या चालकांवर परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबईत कारवाई झाली. मात्र, या संबंधी कोणतेच आदेश पुणे प्रादेशिक परिवहन विभागाला प्राप्त न झाल्याने पुण्यात एकही कारवाई झाली नाही.