Pune Bandh : महापुरुषांच्या सन्मानासाठी बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune bandh

Pune Bandh : महापुरुषांच्या सन्मानासाठी बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन!

हडपसर : महापुरुषांच्या बाबत बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवार (ता.१३) नागरिकांनी पुणे बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विविध शिवप्रेमी संघटनांनी केले आहे. याबाबत हडपसर मधील सर्व संघटना व सामजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांची बैठक येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील जिम्नेशन हॉलमध्ये आयोजित केली होती. त्यावेळी हे आवाहन करण्यात आले. आमदार चेतन तुपे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, योगेश ससाणे, महेश टिळे, संदीप लहाने पाटील, उत्तम कामठे, विठ्ठल सातव, फारुख इनामदार, महेंद्र बनकर, साधना शिंदे, विद्या होडे, डॉ. शंतनू जगदाळे, दिलीप गायकवाड, संजय शिंदे, तुकाराम शिंदे, विवेक तुपे व महाविकास आघाडी व हडपसर भाजी मंडई व्यापारी मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

आमदार तुपे पाटील म्हणाले, "श्रद्धा असेल तर बेताल वक्तव्य मुखातून बाहेर पडतेच कसे, काही घटकांकडून महापुरुषांची बदनामी करणारे प्रशिक्षण साडेतीनशे वर्षांपासून आजतागायत दिले जात आहे. ते रोखण्यासाठी व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तसेच एक दिवस महापुरुषांच्या सन्मानासाठी नागरिकांनी बंद मध्ये सहभागी व्हावे.' या बंदच्या निमित्ताने अशा प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हडपसर काँग्रेस पक्षाच्या वतीने हडपसर वानवडी परिसरात दुचाकी रॅली काढण्यात येणार असल्याचे माजी मंत्री शिवरकर यांनी सांगितले.