घरकाम करणार्‍या महिलांच्या पगारासाठी सोशल मिडियावर कॅम्पेन

A campaign on social media for the wages of working women
A campaign on social media for the wages of working women

पुणे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या समाजातील सर्व स्तराला याचा मोठा फटका बसला आहे. त्यात लोकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना पगार देण्यात यावा अशी मोहीम सध्या फेसबुक मार्फत राबविण्यात येत आहे.

                       
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
लेखक व सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी ही मोहीम हातात घेतली असून सध्या त्यांच्या या मोहिमेला इतरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपल्या या उपक्रमा बाबत बोलताना कुलकर्णी म्हणाले, "समाज मध्यम हा एक चांगला पर्याय आहे इतरांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी. तसेच सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच या माध्यमाचा वापर वेगवेगळ्या चॅलेंज तसेच ट्रेंडसाठी करत आहेत. सध्या शासना समोर बरेच प्रश्न आहेत. त्यामुळे कायद्याने या विषयाकडे बघण्या ऐवजी सामान्य नागरिकांच्या संवेदनेला आवाहन करून हा प्रश्न समाज माध्यमाच्या मदतीने सोडविला जाऊ शकतो. या हेतूने ही मोहीम सुरू केली आहे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 
सध्या घरकाम करणाऱ्या महिलांना पगार दिला जात नसल्याच्या घटना राज्यातील विविध शहरांमधून समोर येत आहेत. तसेच हातातील काम जाऊ नये म्हणून या महिलांकडून प्रशासनाला कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात येत नाही. या मोहिमेच्या माध्यमातून बहुतांश लोकांनी याबाबत सहकार्य केले असून आपण कशा प्रकारे आपल्या घरी काम करणाऱ्या महिला कामगारला मदत करत आहोत या संदर्भातील अनुभव फेसबुकवर मांडत आहेत. तसेच आपल्या आणखी काही मित्र मैत्रिणींना टॅग करत तुम्ही कशी मदत करत आहात हा अनुभव मांडा असे सांगत आहेत. यामुळे जास्तीत जास्त जनजागृती होत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.


#Lockdown2.0 : गायत्रीने केले वडिलांचे घरीच केशकर्तन  पुणे जिल्हा घरकामगार जिल्हाध्यक्ष किरण मोघे म्हणाल्या, "पुणे जिल्हा घरकामगार संघटनेत चाळीस हजार महिलांनी नोंदणी केली आहे. परंतु अद्याप शहरातील बहुतांश महिलांची प्रशासनाच्या वतीने नोंद करण्यात आली नाही. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये किती अशा महिला कामगार आहेत व यातील किती महिला कामगारांना पगार मिळत नाही याची माहिती नाही."

पुणेकरांनो, सावधान! बघता बघता निम्म्या जिल्ह्यात पसरला कोरोना
या मोहिमेमार्फत चांगला संदेश देण्यात येत असून आम्ही याचे स्वागत करतो. घरकाम करणार्‍या महिलां स्वत:हून सुट्टीवर गेल्या नाहीत. त्यांच्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे. याचा विचार करावा. त्यांना पगार मिळाला नाही तर त्यांची उपासमार होईल. नागरिकांनी उदार होऊन घर काम करणार्‍या महिलांना पगार दिला तर त्यांना मदत होईल असे मोघे यांनी सांगितले.

घरेलू मंडळाच्या साहाय्याने होईल मदत 

राज्य प्रशासनाने या घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 2008 मध्ये घरेलू मंडळाची स्थापना केली आहे. यामध्ये एक लाखापेक्षा जास्त महिलांची नोंदणी करण्यात आली असून याचा लाभ या महिलांना मिळत नाही. दरम्यान कोरोनासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविला जात असताना या विषयाकडे सुद्धा लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या घरेलू मंडळाला निधी देऊन या महिलांचे सर्व प्रश्न सोडविण्यास सोपे होईल असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com