पुण्यात कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस मिळेना!

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
covishield vaccine
covishield vaccinesakal
Summary

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पुणे - ‘मला कोरोना प्रतिबंधक लशीचा बूस्टर डोस घ्यायचा आहे. आधीच्या दोन लस कोव्हिशिल्ड घेतल्या आहेत. आता बूस्टरसाठी कॉर्बिव्हॅक्स लशीचा डोस घ्या, असे महापालिकेचे डॉक्टर सांगत आहेत. कोव्हिशिल्डचाच बूस्टर डोस मला आता मिळत नाही,’ असं कोथरूडमधील आकांक्षा पठारे या पोटतिडकीने बोलत होत्या.

पठारे सांगत होत्या, की गेल्यावर्षी कोरोना झाला होता. त्याचा भयंकर अनुभव पाठीशी होता. त्यामुळे पुन्हा तो संसर्ग नकोच, म्हणून तीन महिन्यांनंतर कोव्हिशिल्डची लस घेतली. दुसऱ्या लशीची तारीख लक्षात ठेवली. तीदेखील वेळेत घेतली. आता बूस्टर डोस घ्यायचा आहे. मात्र, महापालिकेत कोव्हिशिल्डचा बूस्टर डोस मिळत नाही. महापालिकेच्या दवाखान्यात कॉर्बिव्हॅक्सची लस बूस्टर डोस म्हणून घ्या. पण, आधीचे दोन्ही डोस कोव्हिशिल्डचे घेतल्याने दुसऱ्या कंपनीची लस बूस्टर डोस म्हणून घेण्याचे धाडस होत नाही. त्यामुळे मी अजून बूस्टर डोस घेण्याचे टाळले आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने कमी झाल्याने प्रतिबंधात्मक लशीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हे डोस पुरतील, पण त्यानंतर शहरात या लशीचा खडखडाट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी माहिती महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमधून मिळाली.

याबाबत पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘शहरात सध्या कॉर्बिव्हॅक्स आणि कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. कोव्हिशिल्डचा तुटवडा सुरू आहे. सरकारने गेल्या तीन-चार आठवड्यांपासून या लशीचा पुरवठा केला नाही. त्यामुळे कोव्हिशिल्ड लशीच्या शिल्लक साठ्यांमध्ये लस देण्यात येत आहे. कोव्हिशिल्ड लशीचे दोन डोस झाले असतील, तर त्या नागरिकांसाठी कॉर्बिव्हॅक्स लशीचा डोस बूस्टर म्हणून घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. कॉर्बिव्हॅक्स लशीचा साठा पुरेशा प्रमाणात आहे. या तीनही लशीचे प्रत्येक दिवशी हजार डोस शहरांमध्ये दिले जातात. लशीच्या डोसची मागणी घटली आहे, त्यामुळे त्याचा पुरवठाही कमी झाल्याचे दिसते.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com