पुणेकरांनो, लोहगाव विमानतळाची क्षमता होणार दुप्पट 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

विमानतळाच्या नवी इमारत पर्यावरणपूरक असेल. तसेच 10 लाख लिटरचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विमानतळाच्या आवारात उभारण्यात येणार आहे. विमानतळाच्या समोरच तीन मजली पार्किंग इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे.

पुणे-  लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प सुमारे दोन वर्षांत पूर्ण होणार असून मार्च 2022 मध्ये प्रवाशांसाठी तो खुला होईल, अशी माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बुधवारी दिली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विमानांच्या रोजच्या उड्डाणांची संख्या सुमारे 220 पेक्षा जास्त होऊ शकेल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हवाई दलाच्या ताब्यात असलेल्या लोहगाव विमातळाच्या विस्तारीकरणाची चर्चा गेली अनेक वर्षे सुरू होती. तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे दीड वर्षांपूर्वी त्याच्या विस्तारीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला आहे. त्यासाठी "एएआय'ने सुमारे 475 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर गर्दीच्या वेळेत सुमारे 2300 प्रवाशांची ये-जा होऊ शकेल. प्रवाशांठी विमानतळाच्या आवारात सुमारे 34 चेक इन काऊंटर्स असतील. विमानतळाच्या नवी इमारत पर्यावरणपूरक असेल. तसेच 10 लाख लिटरचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विमानतळाच्या आवारात उभारण्यात येणार आहे. विमानतळाच्या समोरच तीन मजली पार्किंग इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. एप्रिल 2022 पर्यंत ते पूर्ण होणार आहे, अशी माहिती "एएआय'ने दिली. विमानतळाच्या नव्या इमारतीचे काम सध्या सुमारे 40 टक्के पूर्ण झाले आहे. कोरोनामुळे सध्या मर्यादीत स्वरूपात विमानतळावरून सध्या वाहतूक सुरू आहे. दररोज सुमारे 40 विमानांची वाहतूक होत असून त्यातून सुमारे 9 हजार प्रवाशांची-येजा होत आहे. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

- गर्दीच्या वेळात 1700 देशांतर्गत आणि 600 आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक 
- विस्तारीत इमारत 5 लाख चौरस फूट 
- भारतीय विमानतळ प्राधिकरण खर्च करणार 475 कोटी रुपये 
- खाद्यपदार्थ किंवा खरेदीसाठीच्या दुकानांसाठी जागा 3200 चौरस फूट 
- पार्किंगमध्ये 1024 मोटारींसाठी जागा 
- प्रवाशांसाठी 10 एरोब्रिज होणार 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विमानतळावरून किमान 220 विमानांची दररोज वाहतूक होऊ शकेल. दर तासाला 10 विमानांच्या उड्डाणांची क्षमता असेल. त्यामुळे पुण्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, विस्तारीकरणाचे काम वेळेपूर्वी पूर्ण व्हावे, असा प्रयत्न सुरू आहे. 
- कुलदीपसिंग, संचालक, लोहगाव विमानतळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: capacity of Lohgaon Airport will be doubled