राज्यभरात पकडले 119 कॉपी बहाद्दरांना

Captured 119 copying students in the state
Captured 119 copying students in the state

पुणे : राज्यात बारावीच्या परीक्षेत आज दिवसभरात तब्बल 119 विद्यार्थी कॉपी करताना पकण्यात आले आहेत. यात सकाळच्या सत्रात भौतीकशास्त्र, जीएफसी आणि एसपी या विषयांच्या परीक्षेत 77 जणांवर कारवाई केली. तर दुपारच्या सत्रात राज्यशास्त्राच्या पेपरला 42 जणांना पकडले.

राज्य माध्यमीक व उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाने राज्यात कॉपीचे प्रकार होऊ नयेत यासाठी कॉपी मुक्त अभियान राबविले होते. विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले होते. तरीही कॉपीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत भौतीकशास्त्र, जीएफसी आणि एसपी या तीन विषयांची परीक्षा झाली त्यात 77 जणांना कॉपी करताना पकडले. परंतू, या प्रत्येक विषयात किती विद्यीर्थी पकडले गेले याची माहिती मंडळाकडून उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान, सकाळच्या सत्रात सर्वाधिक कॉपी लातूर विभागात 28, औरंगाबाद विभागात 12 जणांवर कारवाई केली. तर पुणे 2, नागपूर 9, मुंबई 5, कोल्हापूर 7, अमरावती 5, नाशिक 9 जणांना पकडले.

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षात होणार भारतातील गरिबी दूर

दुपारच्या सत्रात राज्यशास्त्राच्या पेपरला 42 जणांना पकडले, त्यात औरंगाबाद विभागात सर्वाधिक 30 जणांवर कारवाई झाली नागपूर 2, नाशिक 5, अमरावती 2, लातूर विभागात 2 जणांना पकडले पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे एकावरही कारवाई केलेली नाही. तर कोकण विभागात दोन्ही सत्रांमध्ये एकही विद्यार्थी कॉपी करताना आढळलेला नाही.

दिव्यांगांसाठी कॅल्क्‍युलेटरची मुभा
शासन निर्णयानुसार 12वीच्या गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, रसायनशास्त्र या विषयांच्या परीक्षेसाठी फक्त पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना कॅल्क्‍युलेटर वापरण्याची परवानगी आहे. विद्यार्थ्यांनी स्वताःचे कॅल्क्‍युलेटर आणावे, मोबाईल व इतर इलेक्‍ट्रॉनिक साधनांमधील कॅल्क्‍युलेटर वापरता येणार नाही, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com