ट्रम्प म्हणतात, दहा वर्षात भारतातील गरिबी होणार दूर; वाचा महत्वाचे १० मुद्दे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

अहमदाबादच्या नवनिर्मित मोटेरा स्टेडियममध्ये नमस्ते ट्र्म्प या कार्यक्रमात ते सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी पुढील दहा वर्षात भारतातील गरिबी दूर होईल असा विश्वास व्यक्त केला. 

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प यांच्यासोबत त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी गुजरातमध्ये जबरदस्त तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांचा रोड शो झाला. त्यानंतर अहमदाबादच्या नवनिर्मित मोटेरा स्टेडियममध्ये नमस्ते ट्र्म्प या कार्यक्रमात ते सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी पुढील दहा वर्षात भारतातील गरिबी दूर होईल असा विश्वास व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोण आहे इवांका; जिचे ट्रम्प अध्यक्ष बनवण्यामागे होते महत्वपूर्ण योगदान

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणातील महत्वाचे १० मुद्दे

१) मला इथे बोलवले हा माझा सर्वात मोठा सन्मान आहेत. भारत देश हा आमचा एक इमानदार मित्र आहे. माझे एवढे मोठे स्वागत केले त्याबद्दल धन्यवाद !
२) पंतप्रधान मोदी हे एक अद्भुत नेते आहेत. ते देशासाठी दिवसरात्र काम करत आहेत.
३) अमेरिकेचे भारतावर खूप प्रेम आहे. भारतात येणे माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये माझे असे स्वागत होणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
४) पुढच्या १० वर्षात भारतातील गरिबी दूर होईल. भारताचा जगासाठी एक मिसाल आहे. हा स्वामी विवेकानंद यांचा देश आहे. भारतात प्रत्येक नागरिकाच्या हक्काचा सन्मान होतो.
५) भारतात प्रत्येक वर्षात २००० चित्रपट बनतात. जगभरात भारतातील संगीत ऐकले जाते.
६) भारतात वेगवेगळ्या धर्माचे लोक सोबत राहतात. सर्वजण मिळून एकत्र पूजा-प्रार्थना करतात. या सर्व गोष्टीतूनच एक महान भारत बनतो.
७) भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश आतंकवादामुळे त्रस्त असून कट्टर इस्लामिक आतंकवादासोबत दोन हात करण्यासाठी भारत आणि अमेरिका कायम एकसोबत असतील.
८) भारत अमेरिकेचा प्रमुख सरंक्षण साथीदार असेल. 
९) भारताची प्रगती हे जगातील प्रत्येकासाठी एक उदाहरण आहे. अमेरिका नेहमी भारताचा प्रामाणिक मित्र असेल.
१०) आम्हाला भारतावर गर्व असून भारत अर्थिक महाशक्ती बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सर्वांच्या घरात वीज आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ten Points in Donald Trump speech in Motera ahemadabad