पुणे येथे भावे हायस्कूल जवळ एका भरधाव कारने १३ जणांना उडवल्याची घटना घडली आहे. अपघातात जखमी झालेले हे सर्वजण MPSC चा अभ्यास करणारे विद्यार्थी असल्याची माहिती कळत आहे. हे सर्वजण चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते..कार चालकाला पोलिसांनी चालकासह तिघांना ताब्यात घेतलं आहे. जयराम शिवाजी मुळे असे आरोपी चालकाचे तर दिगंबर यादव शिंदे आणि राहुल गोसावी अशी अन्य आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही फूटेज आता व्हायरल होत आहे..अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत. अपघातात जखमी झालेल्यांची नावे, अविनाश दादासो फाळके, प्रथमेश पांडुरंग पतंगे, संदीप सुनील खोपडे, सोनाली सुधाकर घोळवे, मंगेश आत्माराम सुरवसे, अमित अशोक गांधी, समीर श्रीपाद भालचिकर, सोमनाथ केशव मेरूकट, प्रशांत ब्रह्मदेव बंडगर, किशोर हरिभाऊ भापकर, पायल आदेश कुमार दुर्गे, गुलणाज सिराज अहमद अशी आहेत..अपघातात जखमी झालेल्यांपैकी तिघांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात तर इतर नऊ जणांना टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात चार विद्यार्थ्यांचे पाय मोडले. सर्व विद्यार्थी भावे हायस्कूलजवळील चहा टपरीवर चहा पिण्यासाठी आले होते, त्यावेळी हा अपघात घडला.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सदाशिव पेठ हे पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात स्पर्धा परिक्षांचे क्लासेस असल्याचे राज्यातील अनेक भागांतून विद्यार्थी या ठिकाणी एमपीएससीची तयारी करण्यासाठी येतात..भावे हायस्कूलजवळ झालेल्या अपघातातील जखमींमध्ये १२ जणांपैकी ९ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी एमपीएससीची तयारी करणारे असून त्यांची उद्या परीक्षा होणार आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले असून सकारात्मक निर्णय घेण्याचा शब्द त्यांनी दिला आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च सरकारमार्फत केला जाईल अशी माहिती कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली..अपघाताच्या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. युवा सेनेच्या नेत्या शर्मिला येवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करून दिली. जखमी विद्यार्थ्यांना जी मदत लागेल ती आम्ही करू असं आश्वासन शिंदे यांनी दिलं. तर आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून यातून काही मार्ग काढून या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेता येईल का? याबाबत विचार करू असं सांगितलं..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.