Accident : कार व मोटारसायकलच्या अपघातात एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

वॅगनआर कार व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक ठार, तर त्यांच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या.
Accident
Accidentsakal

पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) ते लोणी रस्त्यावर लबडेमळा या ठिकाणी वॅगनआर कार व मोटारसायकलची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक सुरेश महादु भोजणे (वय-५५ वर्ष) रा. जारकरवाडी (भोजणदरा) ता. आंबेगाव यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी राजश्री भोजणे (वय-५० वर्ष) या गंभीर जखमी झाल्या आहे.

याबाबत मुलगा अजय सुरेश भोजने यांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून कार चालक निलेश कैलास सुक्रे (रा. खडकवाडी, ता. आंबेगाव) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, आज शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पारगाव लोणी रस्त्यावर सुरेश भोजने त्यांच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल एम. एच. १४ डी. व्ही ९३७१ याच्यावर त्यांची पत्नी राजश्री भोजणे हिला घेऊन जाकरवाडी येथे येत असताना, लोणी बाजुकडून येणाऱ्या कार क्रमांक एम. एच. १४ जे. एक्स. २८३७ या गाडीचा चालक निलेश कैलास सूक्रे याने चुकीचे बाजूने येत भोजणे यांच्या मोटरसायकलला धडक दिली.

या अपघातात सुरेश महादु भोजणे व राजश्री सुरेश भोजणे यांच्या डोक्याला, हाता-पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या. यात सुरेश भोजणे हे मयत झाले आहेत. तर राजश्री भोजने या गंभीर जखमी झाल्या आहेत. पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सांगडे पुढील तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com