
Accident News : डिंगोरे गावच्या हद्दीत कारने पायी चाललेल्या शेतमजुरांना चिरडले; 3 ठार, 2 जखमी
ओतूर : डिंगोर ता.जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर कारने पदचार्याना चिरडले या अपघातात तीन ठार व दोन जखमी झाले आहे. हा अपघात नगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे गावच्या हद्दीत कठेश्वरी पुला जवळ रात्री सव्वा आठ वाजे दरम्यान झाला असून या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला असून इतर दोन जखमी आहे.
या अपघातात सुरमल मांजरे, दिनेश तारोले, जगदीश महेंद्रसिंग डावर हे तीन मयत झाले असून विक्रम तारोले, दिनेश जाधव (पुर्ण नावे समजली नाही) या दोघांवर आळेफाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.सर्व मध्यप्रदेश येथील आहे. या बाबत रूग्णवाहिका चालका कडून मिळालेली माहिती अशी की डिंगोरे येथे मध्येप्रदेश वरून दोन तीन दिवसापूर्वी काही शेत मजूर रोजगारासाठी आले होते.
रविवारी रात्री सव्वा आठ वाजे दरम्यान डिंगोरे गावातून शेती मुक्कामाच्या ठिकाणी नगर कल्याण महामार्गावरून पायी चालले असताना कठेश्वरी पुला जवळ डिंगोरे बाजूला भरधाव वेगाने कल्याण बाजूने आलेल्या कारने या पायी चाललेल्या सर्वाना उडवले.या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून एक व्यक्ती उपचारादरम्यान मयत झाला आहे.तसेच इतर दोघे उपचार घेत आहे.दरम्यान ओतूर पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.