वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे आवश्यक - डॉ.भोंडवे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

सरकारने जाहीर केलेले औषध आजपासून ७३ दिवसांनी देणार आहेत. आपल्यापर्यंत औषध येण्यासाठी अजून वर्ष लागेल. पण कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

पुणे - सरकारने जाहीर केलेले औषध आजपासून ७३ दिवसांनी देणार आहेत. आपल्यापर्यंत औषध येण्यासाठी अजून वर्ष लागेल. पण कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र, रोटरी क्लब आॅफ पाषाण, अखिल मंडई मंडळ आणि पी.पी. ग्रुपच्या वतीने कोरोनावरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करण्यासाठी माहितीपटाचे वितरण पेन ड्राईव्हच्या माध्यमातून अखिल मंडई मंडळाच्या समाजमंदिरात करण्यात आले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, रोटरी क्लब आॅफ पाषाणचे अध्यक्ष विजय रेखी, अ‍ॅड. प्रताप परदेशी, संजय मते, प्राजक्ता जेरे, प्रदीप मुळे,उल्हास पाठक उपस्थित होते.

अजित पवार- फडणवीस पुन्हा एका मंचावर; काय बोलणार याकडे पुणेकरांचे लक्ष

थोरात म्हणाले,"गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करणे ही काळाची गरज होती. कोरोनावरील प्रतिबंधक उपायांचा माहितीपट दाखविल्याने लोकांमध्ये जनजागृती होऊन कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले." शहरातील जास्तीत जास्त गणेशमंडळांना हा माहितीपट देण्यात येणार असल्याचे रेखी म्हणाले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Care must be taken on an individual level dr avinash bhondwe