मंदिर, मस्जिदमध्ये जाताना काय काळजी घ्याल? जाणून घ्या विभागीय आयुक्तांनी दिलेल्या टिप्स

Temple
Temple

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउननंतर ‘अनलॉक १’ची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे अद्याप उघडलेली नाहीत. मात्र, ही गर्दीची ठिकाणे भविष्यात खुली झाल्यानंतर नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर दुकानांमध्येही काळजी घेणे आवश्‍यक आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

धार्मिक स्थळी घ्यावयाची काळजी 

  • प्रवेश करताना स्वच्छता (सॅनिटायझर डिस्पेंसर) आणि थर्मल तपासणी ‍करणे अनिवार्य. 
  • परिसरामध्ये केवळ लक्षण नसणाऱ्या व्यक्तींना परवानगी देण्यात येईल. 
  • मास्क वापरत असल्यासच सर्व लोकांना प्रवेश घेण्याची परवानगी आहे. 
  • ‘कोव्हिड -१९’विषयी प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर्स ठळकपणे लावावेत. तसेच प्रतिबंधात्मक उपायांवर जागरूकता पसरविण्यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप नियमितपणे लावावी. 
  • अभ्यागतांना शक्यतो टप्प्याटप्प्याने (staggering) करुन प्रवेश देण्यात यावा. 
  • बूट, पादत्राणे शक्यतो स्वतःच्या वाहनातच काढून ठेवावीत. आवश्यकतेनुसार प्रत्येक व्यक्ती/कुटुंबासाठी स्वतंत्र स्लॉटमध्ये ठेवले पाहिजे. 
  • पार्किंगच्या ठिकाणी आणि परिसराच्या बाहेर भौतिक अंतर विचारात घेऊन गर्दीचे योग्य व्यवस्थापन करावे. 
  • आवारात बाहेरील आणि परिसरातील कोणतीही दुकाने, स्टॉल्स, कॅफेटेरिया येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. 
  • रांग व्यवस्थान करण्यासाठी सामाजिक अंतर लक्षात घेऊन विशिष्ट चिन्हांकन सुनिश्चित करणे. 
  • अभ्यागतांसाठी शक्यतो स्वतंत्र एन्ट्री आणि एक्झिटचे आयोजन केले जाईल. 
  • रांगेत उभे असताना कमीत कमी ६ फूट शारीरिक अंतर कायम ठेवण्यात यावे. 
  • आवारात प्रवेश करण्यापूर्वी लोकांनी आपले हात-पाय साबणाने धुवावेत. 
  • बसण्याची व्यवस्था करताना पुरेसे सामाजिक अंतर असेल. 
  • व्हेंटिलेशनसाठी सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. 
  • सर्व वातानुकूलन उपकरणांची तापमान सेटिंग २४-३० अंश सेल्सिअसच्या श्रेणीत असावे, सापेक्ष आर्द्रता ४०-७० अंश सेल्सिअसच्या श्रेणीत असावी. मोकळी हवा राहील व क्रॉस व्हेंटिलेशन हवे. 
  • पुतळे, मूर्ती, पवित्र पुस्तके इत्यादिंना स्पर्श करण्यास परवानगी नाही. 
  • मोठी संमेलने, गर्दी निषिद्ध राहिल. 
  • संक्रमणाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता, शक्यतो रेकॉर्ड केलेली भक्तीगीते वाजविण्यात यावीत. सामुहीक गायन करू नये. 
  • एकमेकांना अभिवादन करताना शारीरिक संपर्क टाळावा. 
  • भक्तांनी स्वत:ची प्रार्थना चटई किंवा कपड्याचा तुकडा आणावा, जो ते आपल्याबरोबर परत घेऊ शकेल. 
  • प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारखे कोणतेही भौतिक अर्पण देऊ नये 
  • सामुदायिक स्वयंपाकघर, लंगर, ‘अन्न-दान’ इत्यादी बाबत धार्मिक स्थळांवर अन्न तयार करताना आणि वितरण करताना भौतिक अंतराचे पालन करावे. 
  • परिसरातील प्रभावी स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. विशेषत: शौचालय, हात आणि पाय धुण्याची जागी. 
  • व्यवस्थापनाने धार्मिक स्थानी नियमित साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करावे. 
  • आवारातील मजले /पायऱ्या आवारात अनेक वेळा स्वच्छ केले पाहिजेत. 
  • अभ्यागतांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून वापरण्यात आलेले चेहऱ्यावरील कव्हर्स, मास्क व ग्लोव्हजची योग्य विल्हेवाट लावणे. 
  • आवारात संशयित किंवा पुष्टी मिळालेली आजारी व्यक्ती आढळल्यास तिला एखाद्या स्वतंत्र खोलीत ठेवा, जेथे ते इतरांपासून दूर आहेत. 

दुकानांमध्ये घ्यावयाची काळजी 

  • दुकानदार व ग्राहकांनी मास्कचा वापर करणे आवश्‍यक आहे. 
  • दुकानदार व ग्राहक यांनी भौतिक अंतर किमान एक मीटरचे पालन करावे. 
  • पैशांची देवाण-घेवाण झाल्यास विक्रेते व ग्राहकांनी सॅनिटायजरने हात स्वच्छ करावेत. 
  • दुकानदारांनी डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. 
  • दुकानांमध्ये वस्तू खरेदीसाठी सुरक्षित अंतराची आणि गर्दी होऊ न देण्याची दुकानदारांनी काळजी घ्यावी. ग्राहकांना उभे राहण्याच्या जागेवर ६ फूट अंतराच्या खुणा कराव्यात. टोकन पद्धतीचा अवलंब करावा किंवा ग्राहकांना साहित्याचा घरपोच पुरवठा करू शकतात. 
  • नागरिकांनी शक्‍यतो घराजवळच्याच दुकानांतून खरेदी करावी. खरेदीला जाताना पायी जावे अन्यथा सायकलचा वापर करावा. बिगर अत्यावश्‍यक खरेदीसाठी लांबवर जाऊ नये. 
  • दुकानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ मनपाच्या दवाखान्यात नेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करावी. 
  • दुकानांमध्ये शिरताना पायऱ्या आणि बाहेरील भागावर १ टक्का सोडिअम हायपोक्‍लोराईट द्रावणाची फवारणी करावी. 
  • दुकानांमध्ये ग्राहक काउंटर सोडून गेल्यानंतर ते १ टक्का सोडिअम हायपोक्‍लोराईट द्रावणाने पुसावे.

सार्वजनिक स्वच्छतागृहांतील काळजी 

  • स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी स्वतंत्र स्वच्छता सामुग्रीचा वापर करावा. उदा मॉब, नायलॉन स्क्रबर 
  • कर्मचाऱ्याने स्वच्छता करताना डिस्पोजेबल ग्लोव्हजचा वापर करावा. 
  • ब्लिचचा वापर करणे योग्य नाही. अशा वस्तूंच्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी जसे की फरशी, लोखंड इ. ७० टक्के अल्कोहोलचा वापर करावा. 
  • ताज्या सोडिअम हायपोक्‍लोराईटचा वापर करावा. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com