
स्वत: सोबत देशाचे करिअर करा : प्रा. विजय नवले
सिंहगड रस्ता : स्वत:च्या करिअर सोबत देशाचे करिअर करा, संघर्ष करत राहा, चेहऱ्यावर हास्य ठेवा, न्यूनगंड बाळगू नका, शिक्षणाची कास धरा, इच्छा शक्ति ठेवा नकारात्मकते पासून दूर राहा कारण जीवन जगण्याचा मार्ग आहे, करियरवर एकाग्रता ठेवा. असा सल्ला करिअर मार्गदर्शक समुपदेशक प्रा विजय नवले यांनी दिला. जनता वसाहत येथे काम करणाऱ्या जिजाऊ फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक पालकत्व घेण्यात आलेल्या विद्यार्थिनींसाठी करिअर मार्गदर्शन बाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
राजाराम पूल येथील वीर बाजी पासलकर सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योती ढमाळ, शिक्षण तज्ज्ञ अर्चीता मडके. उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. प्रा. नवले म्हणाले की, "अनेक संकटांचा सामना करत परिस्थितीचे चटके सोसत मी आजवर येत पर्यंत आलो आहे. जोपर्यंत यश संपादन होत नाही तोपर्यंत थांबू नका, संघर्ष करत राहा, शिक्षणाने सर्व काही बदलता येते, ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे; त्या क्षेत्रातील मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच उपलब्ध करून दिले जाईल. करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या कोण कशा घेतात यावर अवलंबून आहे. " मेहनतीला पर्याय नाही, कष्ट करा अभ्यासाचे नियोजन करा, यश नक्की मिळते असे मत अर्चीता मांडके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना ज्योती ढमाळ यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिजाऊ फाउंडेशनच्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजया पवार, विद्या बावधनकर, सागर पवार, जितेंद्र ढमाळ, राजाभाऊ पासलकर, वीर बाजी पासलकर सभागृहाची व्यवस्थापन समिती, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, यांचे सहकार्य लाभले.
Web Title: Career Guidance For Female Students Vijay Navale Statement Make Country Career With Yourself Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..