पुणे - दहावी-बारावीनंतर पुढे काय? हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना सतावतो. करिअरच्या अनेक वाटा समोर असताना योग्य अभ्यासक्रम निवडणे, भविष्यातील संधी ओळखणे आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचणे हे एक मोठे आव्हान असते..याच प्रश्नांची नेमकी आणि सुस्पष्ट उत्तरे देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (ता. ७) आणि रविवारी (ता. ८) कर्वेनगरमधील डीपी रस्ता येथील पंडित फार्म्स येथे हा एक्स्पो होणार असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता त्याचे उद्घाटन होईल..‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे विश्वकर्मा युनिव्हर्सिटी हे मुख्य प्रायोजक तर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि जेएसपीएम युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक आहेत. एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, फ्युएल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया, मराठवाडा मित्र मंडळ, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स हे सहयोगी प्रायोजक आहेत. या एक्स्पोसाठी राजर्षी शाहू सहकारी बँक लिमिटेड हे बँकिंग पार्टनर आहेत. .कनिष्ठ महाविद्यालयांपासून कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या माहितीसह विविध विद्यापीठांसह शिक्षण संस्थांमधील पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करणारी दालने प्रदर्शनात असणार आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांही यात सहभागी होणार आहेत..प्रदर्शनाची वैशिष्ट्ये....दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या संधींविषयी पर्यायांची मिळणार माहितीकला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षणातील अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शनहॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर,माहिती-तंत्रज्ञानासह अन्य अभ्यासक्रमांबाबत समुपदेशनजेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शनपायलट ट्रेनिंग आणि एव्हिएशन कोर्सविषयी मार्गदर्शन.हे ठेवा लक्षात‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२५’➤ कधी : शनिवार (ता. ७) आणि रविवारी (ता. ८)➤ केव्हा : सकाळी १० ते रात्री ८➤ कुठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर, पुणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.