
पुणे : वयोवृद्ध पतीची काळजी घेण्यासाठी ठेवलेल्या दोन केअर टेकर यांनी घरातील धनादेश चोरून व त्यावर परस्पर बनावट सह्या करून तसेच एटीएम कार्ड वरून पैसे काढून तब्बल ३५ लाख ५१ हजारांची फसवणूक केली आहे. याबाबत गिरिजा चंद्रन (वय ७२, रा. पाषाण ) यांनी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे, ज्येष्ठ नागरिकांनी घरी कामावर केअर टेकर ना ठेवता अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.