निष्काळजीपणा कराल तर कोरोनाचा बळी व्हाल

Corona-Virus
Corona-Virus

पुणे - कोरोना या संसर्गाचा प्रादुर्भाव केवळ भारतातच नाही तर जगभरात वाढत आहे. असे असतानाही नागरिकांकडून सातत्याने निष्काळजीपणा दाखविण्यात येत आहे. शरीराची, घरातील व परिसरातील स्वच्छता यास दुर्लक्ष केल्यास संसर्ग होण्याची शक्यता आणखीन वाढते. असे प्रतिपादन आयआयटीएमच्या वैद्यकीय विभागाच्या वैद्यकीय सल्लागार डॉ. ओजस्विनी वालसंगकर यांनी केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयआयटीएमतर्फे शुक्रवारी 'कोविड 19 च्या अनुषंगाने स्वच्छतेचं महत्व' या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

डॉ. वालसंगकर म्हणाल्या, "कोविड 19 या विषाणूचा बाह्य कवच 'लिपिड बायलेअर'चे (लिपिड द्विस्तर) असून साबणाचा पाण्याच्या संपर्कात आल्यावर्ती हा 'लिपिड बायलेअर' विघटित होतो व त्यामुळे विषाणू नष्ट होतात. यासाठी वारंवार हात सुमारे 30 ते 40 सेकंद धुतले पाहिजेत. परंतु असे न केल्यास विषाणू नष्ट होत नाही व संसर्ग होण्याची शक्यता वाढते. तसेच बहुतांश नागरिक मास्कचा वापर व्यवस्थित करत नाहीत. बऱ्याचवेळी बोलताना मास्क खाली किंवा काढला जातो. तसेच वारंवार मास्कला स्पर्श देखील चुकीची सवय आहे. डिस्पोझल मास्कचा वापर करताना मास्कला तसेच टाकण्या ऐवजी 1 टक्के हायड्रोक्लोराईड द्रावणमध्ये किमान अर्धा तास ठेऊन मग तो टाकण्यात यावा. त्यामुळे विषाणू नष्ट होतात व पर्यावरणाचा धोकाही टळतो.

पुणे जिल्ह्यातील 'या' गावात कोरोनाचा शिरकाव

अशी घ्या काळजी -
- मास्क घातल्यानंतर वारंवार स्पर्श करण्यास टाळा
- बाहेरून आल्यानंतर, जेवणा पूर्वी तसेच वेळोवेळी हात साबणाच्या पाण्याने 30 ते 40 सेकंद धुणे
- घरातील स्वच्छतेसाठी सॅनिटायझर, साबणाचे पाणी किंवा इतर कोणत्याही डिसइन्फेकटंटचा वापर दररोज
- घरातील सर्व वस्तूंची दररोज सफाई आवश्यक
- परिसरात कचरा किंवा पाण्याचा साठा होऊ न देणे
- पावसाळ्यात इतर आजारांचेही प्रमाण वाढतात त्यामुळे परिसरातील स्वच्छतेवर अधिकाधिक भर

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com