
मार्केट यार्ड (पुणे) : राज्यभरात तोलाई फक्त पुणे शहरात आहे. अन्य कुठेही पॅकिंग मालावर तोलाई आकारली जात नाही. त्यामुळे बाजारातील तोलणार घटक रद्द करण्यात यावा, अशी मागणी मार्केट यार्डातील दि पूना मर्चंट्स चेंबरकडून करण्यात आली आहे. याबाबत चेंबरकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.
गुरुवारी मार्केट यार्डातील निसर्ग मंगल कार्यालय येथे चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, जवाहरलाल बोथरा, माजी अध्यक्ष राजेश शहा, राजेंद्र गुगळे, राजेश फुलपगर उपस्थित होते. कालबाह्य झालेल्या तोलाई कायद्याात बदल करण्यात यावा. इलेक्ट्रॉनिक वजन काटा असलेल्या व्यापाऱ्यांना तोलाई आकारण्यातून वगळण्यात यावे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जवळपास ५०० घाऊक व्यापारी आहेत. तोलणारांची संख्या ३० आहे. संबंधित तोलणार फक्त काटापट्टी घेऊन जातात. त्यापेक्षा तोलणार दुसरे कोणतेच काम करत नाहीत. तोलणार हा घटक भुसार विभागातून मागे घेण्यात यावा. व्यापाऱ्यांना पडणारा तोलाईचा नाहक भुर्दंड संपुष्टात आणावा, अशी मागणी ओस्तवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मार्केटयार्डमध्ये येणारा ९० ते ९५ टक्के शेतीमाल व्यापारी ते व्यापारी येतो. हा माल पॅकिंग येतो. त्यात शेतकऱ्यांचा कुठलाही सहभाग नसतो. त्यामुळे तोलणारांची गरज नाही. १६ डिसेंबर २०१४ रोजी तत्कालिन पणनमंत्री डॉ. सुभाष माने यांच्या आदेशानुसार ज्या बाजार समितीच्या आवारात इलेक्ट्रॉनिक काटे बसविण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी शेतीमालाचे वजन होत असेल तर तोलाईचे काम तोलणारास देण्याची आवश्यकता नाही. मुंबई उच्च न्यायालयाने १ एप्रिल २०२० पासून पुढील आदेश येईपर्यंत तोलाई देण्यास स्थगिती आदेश दिला आहे. व्यापारी ते व्यापारी खरेदी आणि पॅकिंग मालावर तोलाई आकारण्यात येऊ नये. तोलाई ही फक्त पुणे शहरात आहे. राज्यात अन्य बाजार समितींच्या आवारात तोलाई आकारण्यात येत नाही. तोलणार घटक रद्द करण्यात यावा अशी मागणी चेंबरने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.