काँग्रेस भवन तोडफोडप्रकरणी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

मंगळवारी सायंकाळी वीस ते 25 जणांनी काँग्रेस भवनमध्ये दगडफेक करीत कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेत काँग्रेस भवन कार्यालयामधील एक कर्मचारी जखमी झाला. 

पुणे : काँग्रेस भवन कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भोर, वेल्हा व मुळशी तालुक्‍यातील 19 जणांना अटक केली. मंगळवारी सायंकाळी वीस ते 25 जणांनी काँग्रेस भवनमध्ये दगडफेक करीत कार्यालयाची तोडफोड केली होती. या घटनेत काँग्रेस भवन कार्यालयामधील एक कर्मचारी जखमी झाला. 

पोलिसांकडून ‘डिजिटल चार्जशीट’

याप्रकरणी सचिन अडकेर (वय 43, रा. सदाशिव पेठ) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून नितीन दामगुडे, विक्रम जामदार, सुमंत शेटे, महेंद्र साळुंखे, अनिल सावंत, भूषण खोपडे, जितेंद्र कंक, गणेश बाळू मोहिते, चंद्रकांत मळेकर, बजरंग शिंदे, सिद्धार्थ कंक, अभिषेक येलगुडे, अरुण भिलार, राहुल बोरगे, ज्ञानेश्वर झोरे, महेश टापरे (सर्व रा. भोर) यांच्यासह गणेश जागडे, शिवराज शेंडकर (दोघेही रा. वेल्हे) व राहुल जाधव (रा. मुळशी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमध्ये भवनातील कर्मचारी फुलगावकर मामा जखमी झाले होते. 
 
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case File against 19 people Congress building vandalism in pune