esakal | हद्द झाली! पतंग उडविण्यास विरोध केल्याने 'त्या' तिघांनी काय केलं पाहा
sakal

बोलून बातमी शोधा

Kite_Flying

चव्हाण, पवार आणि गायकवाड या तिघांनी फिर्यादीच्या सासूला शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केली. फिर्यादी सासूची सुटका करण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या पतीला जबर मारहाण केली.

हद्द झाली! पतंग उडविण्यास विरोध केल्याने 'त्या' तिघांनी काय केलं पाहा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सोसायटीच्या छतावर पतंग उडविण्यास जाण्यास विरोध केल्याप्रकरणी तिघानी एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंग करुन त्यांच्यासह त्यांचे पती आणि सासूला जबर मारहाण केली. ही घटना १६ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता भवानी पेठेतील कासेवाडी येथील भिमाले कॉम्पलेक्समध्ये घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर सोमनाथ चव्हाण, राजेश बबन पवार, ईश्वर संतोष गायकवाड (तिघेही रा. भिमाले कॉम्पलेक्स, भवानी पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ३० वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. त्यांच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरे राखत अभ्यास केलेल्या विशालने रोवला अमेरिकेत यशाचा झेंडा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पुणे पोलिस दलात नियंत्रण कक्षात नेमणुकीला आहेत. फिर्यादी या भवानी पेठेतील कासेवाडी येथील भिमाले कॉम्पलेक्स येथे राहण्यास आहेत. त्यांचे पती संबंधीत सोसायटीचे सचिव आहेत. सोसायटीच्या छताला कुलुप असून त्याच्या चाव्या फिर्यादीच्या पतीकडे आहेत. सोसायटीतील मुलांनी त्यांच्या पतीकडे छताच्या दरवाजाच्या चावी मागितली. मात्र त्यांनी त्यास विरोध दर्शविला होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, १६ जुलै रोजी सायंकाळी सात वाजता काही मुले सोसायटीच्या छटावर जात होते. त्यास १२ व्या मजल्यावरील महिलांनी विरोध केला. त्यावेळी त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांच्या सासू अशा दोघी १२व्या मजल्यावर गेल्या. त्यावेळी फिर्यादीच्या सासूने मुलांना भांडण करू नये, असे सांगितले. त्यावेळी चव्हाण, पवार आणि गायकवाड या तिघांनी फिर्यादीच्या सासूला शिवीगाळ करुन त्यांना मारहाण केली. फिर्यादी सासूची सुटका करण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या पतीला जबर मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे कपडे फाडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न निर्माण होईल असे वर्तन केले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top