esakal | गुरे राखत अभ्यास केलेल्या विशालने रोवला अमेरिकेत यशाचा झेंडा... 
sakal

बोलून बातमी शोधा

vishal bharam

जिद्द, चिकाटी, प्रेरणा, अंगी मेहनत असली तर माणूस अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतो, याचेच उदाहरण मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील असदे गावातील विशाल नथू भरम हा तरुण आहे. 

गुरे राखत अभ्यास केलेल्या विशालने रोवला अमेरिकेत यशाचा झेंडा... 

sakal_logo
By
गोरख माझीरे

कोळवण (पुणे) : जिद्द, चिकाटी, प्रेरणा, अंगी मेहनत असली तर माणूस अशक्य गोष्टही शक्य करून दाखवतो, याचेच उदाहरण मुळशी तालुक्यातील दुर्गम भागातील असदे गावातील विशाल नथू भरम हा तरुण आहे. आईवडिलांनी शेती आणि मजुरी करत त्याला उच्च शिक्षण दिले. त्यांच्या कष्टाचे चीज करत तो आता अमेरिकेत अमेझॉन या नामांकित कंपनीमध्ये साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नुकताच कामाला लागला आहे. त्याच्या या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 

अरे व्वा, शिक्षण विभागाने जिओ चॅटवर आपले स्वतंत्र चॅनेल केले  

पुण्यापासून ५० किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेल्या असदे या छोट्याश्या ४००- ५०० लोकसंख्या असलेल्या गावात विशालचा जन्म झाला. त्याचे आईवडिल शेती आणि मजुरी करतात. त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे गावतील शाळेमध्ये मराठी भाषेमधून पूर्ण झालं. त्यातच, गावात शेतात काम करीत असताना धड अभ्यास करण्यासाठीही पुरेसा वेळही नसायचा. शाळेनंतरचा बहुतांश वेळ हा आईवडिलांना शेतामध्ये मदत करण्यासाठी, गाई- म्हशींची चारा- पाण्याची सोय करण्यात जायचा. तसेच, रात्री अभ्यासासाठी वीजही वेळेवर नसायची.  

पुणे विभागात औंध आयटीआय उत्कृष्ठ

विशालला मात्र एक गोष्ट नक्कीच माहीत होती की, ह्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी "शिक्षण" हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळं वेळ मिळेल तसा तो कधी शेताच्या बांधावर, कधी गुरांमध्ये आज बरेचदा रात्रीच्या दिव्याखाली जागून अभ्यास करतच राहिला. काठोर मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या मदतीने त्याने शिक्षणामध्ये नेहमीच प्रावीण्य मिळवलं. सतत नवीन गोष्टी शिकण्याच्या त्याच्या या जिद्दीने व कौशल्याने तो आपला यशाचा मार्ग शोधत राहिला. त्याचे हेच गुणओळखून, अक्षरा ग्रुपच्या मदतीने डॉ. हर्षा जोशी आणि मुदित त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली विशालने दहावीनंतरचे डिप्लोमा (International Baccalaureate Diploma) शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये शिष्यवृत्ती मिळवली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहावीपर्यंत मराठीमध्ये शिकलेल्या व इंग्लिशची अतिशय मर्यादित माहिती असल्यामुळे विशालला सुरवातीच्या काळामध्ये खूपच समस्या आल्या. कॉलेजमध्ये शिकणारी मुले- मुली ही जगाच्या कानाकोपर्यातील ७०-८० देशांमधून आले होते आणि बहुतांश जणांची इंग्लिश खूपच चांगली होती. मात्र, विशालची इंग्लिश खूपच कमकुवत होती. एक अचंबा करणारी गोष्ट म्हणजे, सुरूवतीचा अभ्यासक्रम इतका अवघड होता की, SSC बोर्डमध्ये दहावीमध्ये गावातील विवेकानंद विद्यालयांमधून सर्वाधिक मार्क्स असणारा विशाल अमेरिकेमध्ये पहिल्या सत्रामध्ये एकही विषय पास होऊ शकला न्हवता. पण, तिथेच न थांबला, अनेक मित्रांची व शिक्षकांची मदत घेत, अवांतर वाचन करीत, तो आपले प्रयत्न पुढे करतच राहिला. घराकडून अक्षरशः एक रुपयाचीसुद्धा आर्थिक मदतीची अपेक्षा नसताना विशालने टॉप मार्क्स मिळवून व शिष्यवृत्त्या कमावून अमेरिकेमध्ये बॅचलर आणि मास्टर्स पूर्ण केले. सध्या काम करून तो पी.एचडी.चे शिक्षण घेत आहे. तसेच, तो आता अमेझॉन या नामांकित कंपनीमध्ये साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कामाला लागला आहे. त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे. 

 इंधन दरवाढीचा वेग सुसाट, डिझेलची दरवाढ सुरूच

त्याने सांगितले की, वयाच्या सोळाव्या वर्षी मी घर सोडले. त्यानंतर मला बऱ्याच गोष्टींचा सामोरे जावे लागले. अमेरिकेतील बर्फाळ हिवाळी वातावरणामध्ये ४-५ महिने काढणे, नवीन संस्कृती या बद्दल माहिती करुन घेणे आणि इतर बरेच काही. आयुष्य पूर्णच बदलले की, सर्व सण समारंभ आयुष्यातून नाहीसे झाले. आईच्या हातचे जेवण गेले. अमेरिकेमध्ये आल्यानंतर जीवन इतके स्वावलंबी झाले की, खेडेगावात राहताना एक मुलगा म्हणून जी कामे आजही देशातील तरुणांना कधीच करावे लागले नाही. 

आजची ही संधी वापरून मी आई-वडील, प्राथमिक शाळेचे स्वामी विवेकानंद माध्यमिक शाळेतील शिक्षकांपासून ते अक्षरा, महिंद्रा व सध्याच्या पीएच.डी.च्या प्रोफेसरपर्यंत सर्वांचे मनापासून आभार मानतो. जर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात ध्येयापर्यंत पोहोचले नाही, तर केव्हाच पराभव मानू नका, किंवा त्यापासून माघार घेऊ नका. ध्येयापूर्तीच्या प्रवासामागील अपयशामुळे खचून न जाता, त्यामधून शिकण्याची नवीन संधी शोधण्यामध्येच खऱ्या यशाची सुरुवात आहे.
 - विशाल भरम
 

loading image
go to top