पुणे : माजी नगरसेविकेच्या पतीची आत्महत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जयंत राजपूत यांनी 28 ऑक्‍टोबरला विधी महाविद्यालय रस्त्यावरील कांचनगंगा गल्लीच्या चैतन्य अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये संशयित आरोपींच्या नावाचा उल्लेख केला होता.
Crime
CrimeSakal Media
Summary

जयंत राजपूत यांनी 28 ऑक्‍टोबरला विधी महाविद्यालय रस्त्यावरील कांचनगंगा गल्लीच्या चैतन्य अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये संशयित आरोपींच्या नावाचा उल्लेख केला होता.

पुणे : कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका नीता राजपूत (Former Corporator) यांचे पती जयंत राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी (Suicide) डेक्कन पोलिसांनी (Deccan Police) शनिवारी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा (Crime) दाखल केला. संशयित आरोपींनी पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन मानसिक त्रास दिल्यामुळे राजपूत यांनी 28 ऑक्‍टोबर रोजी त्यांच्या कार्यालयामध्ये आत्महत्या केली होती. (case filed against four persons in connection with suicide of husband of a former corporator in Pune)

Crime
बुरशीजन्य आजारावर उपचारासाठी ‘एसओपी’

राजेंद्र दत्तात्रय मारणे (वय 45, रा. मोहननगर, धनकवडी), डॉ. विवेक रसिकराज वायसे (वय 44, रा. बावधन), बापू सुंदर मोरे (वय 40, रा. सिंहगड रोड), बापूराव विनायक पवार (वय 34, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी निता जयंत राजपूत (वय 55, रा. सदाशिव पेठ) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी निता राजपूत यांचे पती जयंत राजपूत यांनी 28 ऑक्‍टोबरला विधी महाविद्यालय रस्त्यावरील कांचनगंगा गल्लीच्या चैतन्य अपार्टमेंटमधील त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यापूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये संशयित आरोपींच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यानंतर फिर्यादी राजपूत यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारणे हा टेम्पोचालक आहे. मोरे आणि पवार हे दोघेही एका खासगी कंपनीचे वसुली पथकातील व्यक्ती आहेत. त्यांनीच वेळोवेळी फिर्यादींना धमकी दिल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असे राजपूत यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव करीत आहेत.

Crime
अजित पवारांचा एक फोन आणि काही तासात औषधे रुग्णापर्यंत!

जयंत राजपूत आणि संशयित आरोपींमध्ये पैशांची देवाण-घेवाण झाली होती. त्यानंतर चारही आरोपींनी राजपूत यांना पैशांमुळे सातत्याने मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यांच्या "आयुर्मान नॅचरल हेल्थ केअर'च्या कार्यालयात आत्महत्या केली होती. राजपूत यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये "व्यावयासायात आर्थिक तोटा झाला असून आरोपींनी पैशासाठी दबाव आणल्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत,'' असे नमूद केले होते. त्यानुसार राजपूत यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com