

Hanumant Pawar Assault Case Accused to Appear in Court
Esakal
काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यात एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला होता. हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडेसह त्यांच्या साथीदारांनी अचानक हनुमंत पवार यांना मारहाण केली. मित्रमंडळ चौकात घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तुषार दामगुडे यांच्याकडून मला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप हनुमंत पवार यांनी केलाय.