पुणे : तरुणीकडे पाहत अश्‍लिल चाळे करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

खासगी क्‍लाससाठी पायी जाणाऱ्या एका तरुणीकडे पाहून अश्‍लिल चाळे करीत तरुणाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी अनोळखी तरुणाविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता सदाशिव पेठेत घडली. 

पुणे : खासगी क्‍लाससाठी पायी जाणाऱ्या एका तरुणीकडे पाहून अश्‍लिल चाळे करीत तरुणाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी अनोळखी तरुणाविरुद्ध दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता सदाशिव पेठेत घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व तिची मैत्रीण या दोघीही महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतात. शुक्रवारी सकाळी आठ वाजता दोघीही खासगी क्‍लासला जात होत्या. त्या सदाशिव पेठेतील आकृती संकुल या सोसायटीसमोरुन पायी जात होत्या. त्यावेळी रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या 25 ते 30 या वयोगटातील तरुणाने त्यांच्याकडे पाहून अश्‍लिल चाळे केले. तसेच अंगावरील कपडे काढून अश्‍लिल हावभाव केले. या प्रकारामुळे दोन्ही तरुणी घाबरल्या होत्या.

अभिमानास्पद ! 'ही' व्यक्ती होणार देशातील पहिली मूकबधिर सरपंच

दोन दिवसानंतर रविवारी त्यांनी दत्तवाडी पोलिस ठाणे गाठून अनोळखी तरुणाविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज अभंग करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against young man for girl abusing in Pune