प्रशासनाला गुंगारा देत मुंबईहून धनगरवाडी आला अन्... 

रवींद्र पाटे
सोमवार, 29 जून 2020

प्रशासनाला गुंगारा देऊन मुंबई येथून धनगरवाडी येथे आलेला कोरोना बाधित तरुण व आश्रय देणारा त्याचा नातेवाईक अशा दोघांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नारायणगाव (पुणे) : प्रशासनाला गुंगारा देऊन मुंबई येथून धनगरवाडी येथे आलेला कोरोना बाधित तरुण व आश्रय देणारा त्याचा नातेवाईक अशा दोघांवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रमेश शिवाजी पाटोळे (राहणार धनगरवाडी) याच्यासह मुंबई येथून आलेला कोरोना बाधीत तरुण यांच्या वर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

या बाबत अर्जुन घोडे पाटील म्हणाले, कोरोना बाधित तरुण मुंबई येथील रेड झोन मधून १८ जून रोजी धनगरवाडी येथील रमेश पाटोळे यांच्याकडे आला होता. या बाबतची माहिती त्यांनी स्थानिक ग्रामपंचायत अथवा प्रशासनाला दिली नाही. कोरोना सदृश लक्षणे दिसू लागल्याने २५ जून रोजी तपासणीसाठी त्याला पुणे येथे पाठवण्यात आले होते.

'पुण्याची पीएमपी व्हेंटिलेटरवर; करार रद्द करण्यासाठी कंत्राटदारांना नोटिस

त्याचा  कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ४२ पैकी ३० जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले असून १२ जणांना तपासणीसाठी लेण्याद्री कोविड केंद्रात पाठवण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कोरोना बाधित व त्याचा नातेवाईक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has been registered against two persons from Dhangarwadi