
Pune Crime News : पाबे गावातील तरुणाच्या निघृण हत्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल
वेल्हे,(पुणे ) : जमिनीच्या वादातून वेल्हे तालुक्यातील पाबे गावातील तरुण नवनाथ उर्फ पप्पू शेठ नामदेव रेणुसे (वय.३८)याचा वेल्ह्यातील हॉटेल विसावा मध्ये गोळ्या झाडून तोंडावर धारदार शस्त्र ने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवार (ता.०६) रोजी घडली होती.
याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे रा.पाबे,ता.वेल्हे .जि.पुणे व इतर अज्ञात ४ जणांवर गुन्हा दखल करण्यात आला असून आरोपी फरार असल्याची माहिती वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिली आहे.
या प्रकरणी सुरेश नामदेव रेणूसे (वय.४५) राहणार पाबे ,ता.वेल्हे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सात ते आठ वर्षांपूर्वी आरोपी माऊली रेणुसे याने मरळ आवाडातील जमीन खरेदी केली होती.
या बाबत कोर्टात केस चालू होती तर याबाबत जमीनी बाबत मयत नवनाथ हा मरळ आवाडातील लोकांना आरोपी विरुध्द काहीतरी काड्या करत असून लोकांना एकाचे दोन सांगत असल्याचा संशय माऊली रेणूसे याच्या मनात होता.
हा राग मनात धरून माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर रेणुसे याने त्याच्या चार साथीदारासह वेल्हे येथील हॉटेल विसावा मयत नवनाथ ऊर्फ पप्पू नामदेव रेणुसे रा. पाबे ता. वेल्हे जि. पुणे याचेवर पिस्टल मधुन गोळ्या झाडुन व धारदार चाकुने व सत्तुरने चेहऱ्यावर वार करुन खुन केला.
या घटनेमुळे तालुक्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. घटनास्थळी पोलीस अधिकारी अपर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे,उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अविनाश शिळीमकर यांनी भेट घेऊन आरोपींचा शोध चालु असुन अधिक तपास वेल्ह्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार करत आहेत.