खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

गुंडांमार्फत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक यांच्यासह चौघांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
crime
crimesakal
Summary

गुंडांमार्फत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक यांच्यासह चौघांविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

पुणे - जमीनीच्या वादातून गुंडांमार्फत जमीन मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक विष्णु हरिहर यांच्यासह चौघांविरुद्ध शुक्रवारी (ता.17) स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. हि घटना सॅलिसबरी पार्क परिसरातील गोल्डन बेकरीसमोर घडली.

विष्णु अप्पा हरिहर, राहुल दत्ताराम खुडे (वय 38, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), प्रेम शाम क्षीरसागर (वय 18 , रा. पर्वती दर्शन) व अन्य व्यक्तीविरुद्ध स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल खुडे व प्रेम क्षीरसागर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सादीक सलीम खोजा (वय 39, रा. बोट क्‍लब रस्ता) स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सादीक खोजा यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.

कोंढव्याजवळील येवलेवाडी येथे त्यांची वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांना संबंधित जमीनीवर व्यावसायिक प्रकल्प सुरु करायचा होता, परंतु कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना व्यवसाय सुरु करता आला नाही. दरम्यान, मागील वर्षी हरिहर व खुडे या दोघांनी त्यांच्याकडे जाऊन जमिनीचा व्यवहार करायचे असल्याचे त्यांना सांगितले. प्राथमिक चर्चेनंतर हरिहर व खुडे यांनी फिर्यादीवर त्यांची जमीन विकण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर फिर्यादी हे गोल्डन बेकरीजवळ उभे असताना हरिहर व अन्य संशयित आरोपींनी शस्त्रे समवेत आणून त्यांच्या कारची तोडफोड केली. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केल्याने फिर्यादीने त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली नाही.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी खुडे याने फिर्यादीस फोनवरुन धमक्‍या देण्यास सुरुवात केली. तर फिर्यादी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला सॅलिसबरी पार्क येथील गोल्डन बेकरीसमोर भेटण्यासाठी गेले होते. संबंधीत व्यक्तीसमवेत ते जमीनीच्या व्यवहाराबाबत चर्चा करुन बाहेर त्यांच्या कारकडे येत होते. त्यावेळी खुडे हा त्याच्या हातात शस्त्र घेऊन काही अंतरावर उभा असल्याचे त्यांना दिसले. या प्रकारामुळे अखेर फिर्यादीने स्वारगेट पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com