esakal | पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Curfew

गेल्या दोन दिवसात पोलिसांनी एक हजार ७१३ जणांवर मास्क न वापरल्या प्रकरणी कारवाई केली आहे.

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रात्रीच्या संचारबंदीची (Night Curfew) कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीत २८ फेब्रुवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदी लागू झाल्याने रात्री अकरानंतर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे. अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्तींना यातून वगळण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडे ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे. पोलिसांकडून आज संचारबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत २८ फेब्रुवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग देण्याच्या बहाण्याने महिलांना गंडवलं; विश्रांतवाडीतील प्रकार​

दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मास्क न घालता फिरणारे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिला आहे. पोलिसांकडून सध्या चौका-चौकात थांबून मास्क न घालणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई केली जात आहे. तसेच, प्रवासी कारमध्ये मास्क न घालता प्रवास करणाऱ्यावर कारवाई करून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.

पुणे : साखरपुड्यात राडा; जेवणावरून झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला​

दोन दिवसात एक हजार ७१३ जणांवर कारवाई :
गेल्या दोन दिवसात पोलिसांनी एक हजार ७१३ जणांवर मास्क न वापरल्या प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून आठ लाख रुपयांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. तर आत्तापर्यंत एकूण दोन लाख ५३ हजार जणांवर मास्क न वापरल्याची कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना विरोधात लढण्यासाठी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन काळात पुणेकरांनी नियमांचे मोठ्या प्रमाणात पालन केले. त्यामुळे हा लढा कायम ठेवण्यासाठी आता देखील नागरिक नियम व अटींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करतील, असा विश्‍वास आहे.
- डॉ. रवींद्र शिसवे, सह पोलिस आयुक्त

पुणे विद्यापीठाच्या बैठकीत ABVPचा खोडा; परीक्षा फीवर विद्यापीठ गप्प​

महत्त्वाचे
- रात्री ११ ते सकाळी सहा दरम्यान असणार संचारबंदी
- रात्रीच्या वेळी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर होणार कारवाई
- २८ फेब्रुवारीपर्यंत असणार कडक निमय
- मास्क न वापरणा-यांवर केली जात आहे कारवार्इ
- नियमांचे पालन करण्याचे पोलिसांचे आवाहन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)