esakal | पुणे : साखरपुड्यात राडा; जेवणावरून झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला
sakal

बोलून बातमी शोधा

Engagement

साखरपुड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी या जेवण करण्यासाठी गेल्या. मात्र जेवण संपत आले होते. त्यामुळे आरोपी हा सईद शेख यांना जेवणावरून शिवीगाळ करीत होता. ​

पुणे : साखरपुड्यात राडा; जेवणावरून झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : साखरपुड्याच्या कार्यक्रमात जेवण संपल्याने एकास शिवीगाळ होत असताना त्यात मध्यस्ती केली आणि ती अंगलट आल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. तिघांवर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या या हल्ल्यात मुलीच्या शेजारी राहत असलेले कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत.

पुणे विद्यापीठाच्या बैठकीत ABVPचा खोडा; परीक्षा फीवर विद्यापीठ गप्प​

पाटील इस्टेटमधील गल्ली नंबर दहामध्ये शनिवारी (ता.२०) रात्री सातच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी गौरी खान (वय २२) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीस वर्षीय एक महिला, शौकत नबू शेख (वय २८) आणि निसार पांगु खान (वय ३७, रा. वाकडेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. तर सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या हल्ल्यात फिर्यादी शेख, मजीद मेहबूब खान (वय ५५) आणि शौकत मजीद खान (वय ३०, रा. लोहियानगर, गंज पेठ) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या मुलीचा साखरपुडा असल्याने फिर्यादी यांचे नातेवाईक आणि शेजारी त्या कार्यक्रमास गेले होते. फिर्यादी यांचे इतर नातेवाईक देखील त्यावेळी उपस्थित होते.

शुभमंगलसाठी जरा ‘सावधान’​

साखरपुड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर फिर्यादी या जेवण करण्यासाठी गेल्या. मात्र जेवण संपत आले होते. त्यामुळे आरोपी हा सईद शेख यांना जेवणावरून शिवीगाळ करीत होता. फिर्यादी यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपीने चिडून जाऊन त्याच्या इतर नातेवाईकांसह संगमनत करून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्रमांसाठी आलेल्या पाहुण्यांची धांदळ उडाली होती.

धक्कादायक! टिकटॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या​

पाटील ईस्टेट मे हम ही भाई है 
‘‘हमारे आगे कोई आना नही, हमारे साथ जो खेटेगा उसको हम लोक छोडेगा नही. पाटील ईस्टेट मे हम ही भाई है, असे मोठ-मोठ्याने म्हणत आरोपींनी पाटील इस्टेटमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप चव्हाण करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)