अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

अल्पवयीन असल्यापासून लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तरूणाविरूध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील खडकी येथील तेवीस वर्षीय तरूणी पुण्यात शिक्षणासाठी असताना ती अल्पवयीन असल्यापासून लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या तरूणाविरूध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.

पुण्यातील कर्वे रोड हिंगणे परिसरात शिक्षणासाठी खडकी येथून गेलेल्या तरुणीशी ती अल्पवयीन असल्यापासून जून 2014 ते 14/7/2022 दरम्यान अमोल उर्फ शरद अर्जुन जाधव (सध्या रा. पुणे कर्वे रोड, हिंगणे, तर मूळगाव अकोळनेर, जि. अहमदनगर) या तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने लैंगिक संबंध ठेवले. पिढीत तरूणीला परिक्षेच्या कालावधीत पेपर चे प्रश्न देऊन खूप मदत केल्याने माझ्याबरोबर प्रेम संबंध ठेव अशी मागणी करून तिच्या इच्छेविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच लग्नाचे वय पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर लग्न करीन असे आश्वासन पिढीत तरूणीला देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. संबंध न ठेवल्यास दमदाटी व काढलेले फोटो, शुटींग व्हायरल करण्याची धमकी दिली.

लग्न करण्याची मागणी पिढीत तरूणीने वारंवार केल्यानंतर अमोल जाधव याने 29 / 10 / 2018 रोजी आळंदी येथे नेहून कृष्णा मंगल कार्यालयात त्याची बहिण छाया बाळू पवार तिचा पती बाळू पवार यांच्या समक्ष लग्न लावून दिले. त्यानंतर पिढीत तरूणीला होस्टेलवर आणुन सोडले. 2020 साली कोविड काळात पिढीत तरूणीला मूळगावी आणून सोडले. त्यानंतर आरोपी अमोल जाधव याने पिढीत तरूणीला फोन करून तु माझ्याबरोबर लग्न केले असून माझ्या घरी नांदायला ये. अन्यथा तुमच्या गावात येऊन तुझी व वडिलांची बदनामी करण्याची धमकी दिली.

लग्नाचे पुरावे, फोटो व्हिडिओ वायरल करीन अशी धमकी दिल्याने भितीपोटी सदरची घटना घरच्यांना सांगितली नव्हती. मात्र अमोल उर्फ शरद अर्जुन जाधव याने फोनवर वारंवार दमदाटी, शिवीगाळ केल्याने पिढीत तरूणीने दौंड पोलिसात फिर्याद दिली. यावरून दौंड पोलिसांनी अमोल पवार याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376(2)(N),504,506, बाललैंगिक अपराधा पासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 8,12 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.

Web Title: Case Registered Against Young Man Minor Girl Under Pretext Marriage Cheating Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top