esakal | पुणे: 'शंखनाद' पडला महागात! चंद्रकांत पाटील आणि महापौरांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे : 'शंखनाद' महागात! चंद्रकांत पाटलांसह महापौरांवर गुन्हा दाखल

पुणे : 'शंखनाद' महागात! चंद्रकांत पाटलांसह महापौरांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 ऑगस्ट रोजी मंदिर उघडण्यासाठी केलेल्या शंखनाद आंदोलनामध्ये कोरोना नियमावलीचं पालन न केल्याबद्दल हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 30 ऑगस्ट रोजी हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी शहाराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक, आमदार मुक्ताताई टिळक यांच्यासह शहर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मंदीरांची वेळ ठरवून आणि भाविकांची संख्या निश्चित करुन ही परवानगी द्यावी, अशी भूमिका भाजपने या आंदोलनाच्या माध्यमातून मांडली होती.

या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामदैवत श्री. कसबा गणपती मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र, या आंदोलनात कोरोना नियमावलीचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे या आंदोलनात सहभागी नेत्यांवर तसेच कार्यकर्त्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top