दुचाकीस्वार लूट प्रकरणी अल्पवयीनसह दोघांना अटक

संदीप भेगडे
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

किवळे : बारा ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास मामुर्डी मासुळकर फार्महाउस समोर दुचाकीस्वाराला अडवून अपहरण करीत कोयत्याचा धाक दाखवुन त्याच्याकडील किंमती साहित्य लुटल्याप्रकरणी एका अल्पवयीनसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीस बळजबरींने दुचाकीवर बसवुन अंधारात नेत त्याच्याकडील साेन्याचे दागिने,मोबाइल असा ७२ हजारांचा माल चोरुन नेला होता.

गुन्हा दाखल झाल्यावर डीबी पथकांने गोपणीय बातमीदार नेमूण गुन्हयाचा तपास करुन साेन्या उर्फ समीर जालींदर बोडके (वय २४ वर्षे रा गहुंजे ता मावळ) जि पुणे यास आणि त्याचा अल्पवयीन साथीदार अशा दोघांना ताब्यात घेउन तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. चाेरलेले दागिणे, मोबाइल हस्तगत करण्यात आले आले. दुचाकी व कोयताही जप्त केला असुन आरोपी बोडके सध्या पोलिस कोठडीमध्ये आहे.दरम्यान फिर्यादीचे नाव गुप्त ठेवले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज पवार, पोलिस नाईक प्रमोद उगले, योगेश जाधव, मयुर जगदाळे, सुमित मोरे, सागर शेळके यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: In the case of two-wheeler theft two arrested along with a minor