

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - शहरातील जनगणनेचे काम संथगतीने सुरू असून, अनेक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ५० टक्के कामही पूर्ण झाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वारंवार सूचना, बैठका आणि आदेश देऊनही कर्मचारी कामावर हजर राहत नसल्याने महानगरपालिका प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली असून, जनगणनेच्या कामात कसूर करणाऱ्या सुमारे ८०० कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.