बँकेतील अफरातफरीचे खाफर अंगावर येण्याच्या भीतीने कॅशियरने उचलले नको ते पाऊल

डॉ. संदेश शहा
Monday, 20 July 2020

बँकेतील १८ लाख रुपयाच्या अफरातफरीचे खापर अंगावर येण्याच्या भितीने रोखपाल सतीश शेंडे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली.

इंदापूर- निमगाव केतकी ( ता. इंदापूर ) येथे बँकेतील १८ लाख रुपयाच्या अफरातफरीचे खापर अंगावर येण्याच्या भितीने रोखपाल सतीश शेंडे यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी निलेश बनकर, तेजस हेगडे या दोघांना अटक केली असून अण्णाजी कुलकर्णी यांचा तपास सुरूअसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक बिराप्पा लातुरे यांनी दिली.

निमगाव केतकी येथील सांगोला अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेतील सुवर्णयुगेश्वर ग्रामीणबिगर शेती पतसंस्थेने मुदतठेव ठेवलेल्या 20 लाख रुपयांवर 18 लाख रुपये ठेव तारण कर्ज उचलले गेल्याची अफरातफर दि. १३ जुलै २०२० रोजी उघडकीस आली. त्याचे खापर रोखपाल म्हणून आपल्यावर फुटेल या भितीने  सतीश दशरथ शेंडे ( रा. निमगांव केतकी ) यांनी वडापूरे यांच्या पेट्रोल पंपाजवळ औषध प्राशन करून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. अकलूज येथे उपचारादरम्यान त्यांचा दि. १९ जुलै रोजी मृत्यू झाला असून  पत्नी ज्योती सतिश शेंडे ( वय 26 वर्षे ) यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. 

राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर; अजित पवारांवरील टीकेची केली...
दि. 12 ते 17 जुलै २०२० पर्यंत पती सतीश यांना उपरोक्त तिन्ही आरोपींचे फोन आले की शेंडे तणावात जात होते. फिर्यादीने पती शेंडे यांना याबाबत विचारले असता अण्णाजी कुलकर्णी यांनी शेंडे यांना माहीत न होता पतसंस्थेचे तेजस हेगडे यांच्याकडून 20 लाख रुपयांची मुदत ठेव रकमेवर 18 लाख रुपये ठेवतारण कर्ज काढून घेतले.  त्यांनी 31 जानेवारीपासून काम सोडले. शेंडे बँकेत कॅशियर म्हणून काम करत असताना  कुलकर्णी यांनी कॅश शेंडे यांच्या काऊंटरमध्ये ठेवून आरटीजीएस केले. ही अफरातफर सोमवार दि. 13 जुलै रोजी उघडकीसआली . त्याचे खापर शेंडे यांच्यावर फुटेल हे त्यांना सहन झाले नाही. निलेश बनकर यांच्याकडे शेंडे यांचे वैयक्तिक 85 हजार गेले दोनवर्षा पासून आहेत. त्यामुळे त्यांनी तिन्ही आरोपींच्या त्रासाला कंटाळून दि. 17 जुलै रोजी सकाळी दहा वाजता निमगाव केतकी येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीत ज्योती शेंडे यांनी म्हटले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cashier leave world for fear of bank fraud