मांजराला वाचवायला जाणं बेतलं असतं जीवावर, दैव बलवत्तर म्हणून वाचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांजराला वाचवायला जाणं बेतलं असतं जीवावर, दैव बलवत्तर म्हणून वाचला

मांजराला वाचवायला जाणं बेतलं असतं जीवावर, दैव बलवत्तर म्हणून वाचला

कोथरुड : मांजर वाचवायला गेलेला एक युवक वेताळ टेकडीवरील खाणीत पडून जखमी झाला. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) जवानांनी त्याला सुखरुप बाहेर काढला. या तरुणावर रुग्णालयात(Hospital) उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: Omicron बाबत आरोग्य मंत्रालयाकडून रणनीतीत बदल

अग्निशमन अधिकारी राजेश जगताप म्हणाले की, रामदास उभे, वय २४, रा. म्हातोबा नगर हा युवक वेताळ टेकडीवरील खाणीत सुमारे ८० फुट खाली पडला होता. झुडपात अडकलेल्या या युवकाच्या हाता पायाला दुखापत झाली आहे. तेथे असलेल्या खाणीत अडकलेल्या मांजरीला वाचवायला गेला असता तोल जावून तो खाणीत पडला असे काही जणांचे म्हणणे आहे. यासंदर्भात सकाळी सव्वासातच्या सुमारास आम्हाला फोन आल्यावर आम्ही घटनास्थळी गेलो. मारुती मंदिरा पर्यंतच गाडी जाते. तेथून आम्ही छोटी गाडी घेवून घटनास्थळी गेलो. या युवकाला रश्शी व तराफाचा वापर करीत जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात रवाना केले.

हेही वाचा: कोल्हापूर : काजू टरफलीच्या कारखान्याला आग

एरडंवणा पोलिस चौकीचे पोलिस उपनिरिक्षक चैतन्य काटकर म्हणाले की, सकाळी या घटने संदर्भात कळताच मार्शल घटनास्थळी गेले. या युवकावर रुग्णालयात उपचार सुरु असून चतुशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सदर घटना घडली असल्याने ते अधिक तपास करत आहेत.

जखमी युवकालाल बाहेर काढण्याचे काम अग्निशमन अधिकारी राजेश जगताप, चालक अमोल शिंदे, विजय शिंदे, तांडेल सचिन आयवळे, राजेश कुलकर्णी व जवान सचिन वाघोले, शैलेश दवणे, जितेंद्र कुंभार, प्रविण रहाटे, पंढरीनाथ उभे, संजय भावेकर, प्रकाशदाजी कांबळे, शुभम गोल्हार, हेमंत कांबळे यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune News
loading image
go to top