लातूरच्या डॉक्टरची पुण्यात सीबीआय चौकशी

लातूरच्या डॉक्टरची पुण्यात सीबीआय चौकशी
Published on

पुणे, ता. २० : देशभर गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) लातूरमधील एका बालरोगतज्ज्ञाची कसून चौकशी केली. तसेच, पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्या घरासह महाविद्यालयातील लॉकरची झडती घेण्यात आली.
या प्रकरणात दररोज १० ते १५ विद्यार्थी आणि पालकांची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. लातूरमधील ‘आरसीसी क्लासेस’चा संचालक शिवराज मोटेगावकर सध्या ‘सीबीआय’ कोठडीत असून, त्याच्या कार्यालय आणि निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत. आर्थिक व्यवहार, प्रश्नपत्रिका गळतीचे धागेदोरे आणि एजंटमधील संपर्काची पडताळणी ‘सीबीआय’ करत आहे. पेपर कोणाच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले याचा तपास सुरू आहे. त्यामुळे आता प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांपासून संबंधित विद्यार्थी ‘सीबीआय’च्या रडारवर आहेत.
लातूरमधील एका बालरोगतज्ज्ञाची बुधवारी चौकशी करण्यात आली. या डॉक्टरला ताब्यात घेत पुण्यातील ‘सीबीआय’ कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणात यापूर्वी परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध असलेल्या प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयातील जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे, बिबवेवाडीतील ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील धनंजय लोखंडे यांनाही अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com