दांड्या मारणाऱ्या CBSC विद्यार्थ्यांचे 10 वी, 12 वीचे वर्ष धोक्‍यात?

CBSE 10th and 12th students can Give exam only after Completing 75 percent attendance.jpg
CBSE 10th and 12th students can Give exam only after Completing 75 percent attendance.jpg

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) शाळांमध्ये 10वी आणि 12वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची 75 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती असली तरच त्यांना परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन अहवाल विभागीय कार्यालयात सादर करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत.

नाव सह्याद्री, चिकाटी तर असणारच; 4 वर्षांच्या चिमुकलीने सर केला लिंगाणा 
 

'सीबीएससी'ने नुकतेच 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले असून, या दोन्ही इयत्तांच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर हे परीपत्रक काढल्याने कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, 'सीबीएससी'च्या परीक्षेच्या नियमावलीतील 13व्या कलमानुसार जर विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असेल तर त्यांना परीक्षेला बसत येत नाही असे नियम आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी 'सीबीएससी'ने जुलै महिन्यात परिपत्रक काढले होते, त्यामध्ये विद्यार्थांनी नियमीत शाळेत यावे, त्यांची उपस्थिती किमान 75 टक्के असली पाहिजे अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

पुण्यात महिलांच्या स्वच्छतागृहात मिळतोय वडापाव

'सीबीएससी'ने काही दिवसांपूर्वी परीपत्रक काढून जुलै महिन्यातील पत्राचा संदर्भ दिला आहे. 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती किती टक्के आहे याचा आढावा घेण्याचे आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहेत. उपस्थिती कमी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी विभागीय कार्यालयांना पाठवली जाणार आहे. जवळच्या व्यक्तीचे निधन, विद्यार्थ्याचे आजारपण, क्रीडा स्पर्धांमधील सहभाग, नैसर्गीक आपत्ती या करणांनी एखाद्याला शाळेत जाता आले नसेल त्यामुळे उपस्थिती 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असेल तर त्यांना 7 जानेवारी पर्यंत पुरावे सादर करावे लागणार आहेत, असे परीपत्रकात नमूद केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com