
पुण्यातील शाळा आणि पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुणे पोलिसांकडून आणि शिक्षण विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या अपघातांच्या आणि अपहरणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावणं आणि महिला अटेंडंटची नियुक्ती करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे.